शिवसेना शिंदेचीच! नार्वेकरांच्या निर्णयावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

शिवसेना शिंदेचीच! नार्वेकरांच्या निर्णयावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना असल्याचे नार्वेकरांनी स्पष्ट करत शिंदे गटाचे आमदार पात्र ठरवले आहेत. यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे.
Published on

पुणे : शिवसेनेतील फुटीनंतर निर्माण झालेल्या राजकीय आज ऐतिहासिक निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला आहे. यावेळी एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना असल्याचे नार्वेकरांनी स्पष्ट करत शिंदे गटाचे आमदार पात्र ठरवले आहेत. यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. शरद पवार यांनीही या निकालावर पत्रकार परिषदेद्वारे प्रतिक्रिया दिली आहे.

शिवसेना शिंदेचीच! नार्वेकरांच्या निर्णयावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नार्वेकरांनी भाजपच्या मिठाला इमान राखण्याचं काम प्रामाणिकपणे केलं; अंधारेंचा घणाघात

शरद पवार म्हणाले की, आजच्या निकालात यत्कचिंतही आश्चर्य नाही. आम्ही आपसात जी चर्चा करायची की हा निकाल उद्धव ठाकरेंना अनुकूल नसेल. मुख्यमंत्र्यांना हा निकाल त्यांच्या बाजूने लागेल हा आत्मविश्वास आहे. राहुल नार्वेकरांनी दोन्ही बाजूंना पात्र ठरवलं आहे. नार्वेकर यांनी सर्वोच्च न्यायालयाची गाईडलाईन बदलली आहे. सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी उद्धव ठाकरे यांना संधी आहे. उद्धव ठाकरे यांना सर्वोच्च न्यायालयात न्याय मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

विधिमंडळापेक्षा पक्ष संघटना महत्वाची असते हा निकाल सर्वोच्च न्यायालयाने या दिला आहे. मात्र विधिमंडळाचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी वेगळा निकाल दिला. सर्वोच्च न्यायालयाच्या आधीच्या निकालानुसार व्हीप बजावण्याचा अधिकार पक्ष संघटनेला असतो, विधिमंडळाला नाही.

नार्वेकर यांनी दिलेला निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पायमल्ली आहे हे सांगण्याची संधी आम्हाला महाविकास आघाडीला प्राप्त झाली आहे. आम्ही तो कार्यक्रम लवकरच सुरु करू, असे त्यांनी म्हंटले आहे. तसेच, भरत गोगावले यांना व्हीपचा दिलेला अधिकार हा वादाचा विषय ठरू शकेल, असेही शरद पवार म्हणाले आहेत.

दरम्यान, निकाल दोन दिवसांवर आला असताना नार्वेकर मुख्यमंत्र्यांना भेटायला जात असतील तर निकाल स्पष्ट होता. त्यामुळे इतरांच्या बाबतीत देखील असाच निकाल येईल अशी शक्यता त्यांनी राष्ट्रवादी निकालाबाबत वर्तवली आहे. तसेच, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला अवघे काही महिने राहिले आहेत. या निकालाचा आमच्यावर परिणाम होणार नाही, असेही शरद पवारांनी सांगितले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com