देशातील पहिला सर्जिकल स्ट्राईक शिवरायांच्या काळात; शरद पवारांचा अप्रत्यक्ष टोला
पुणे : यंदाचा लोकमान्य टिळक पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आला. यावेळी शरद पवारही उपस्थित होते. पुरस्कार दिला जात असल्याबद्दल अंतकरणापासून अभिनंदन करत असल्याचे शरद पवार यांनी म्हंटले आहे. देशांतील पहिला सर्जिकल स्ट्राईक छत्रपती शिवाजी महाराजांनी लाल महालात केला होता, असे म्हणत शरद पवारांनी अप्रत्यक्षपणे मोदींना टोला लगावला.
मी पंतप्रधानांना सांगू इच्छितो की पुण्याचे देशात एक वेगळं महत्व आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्म झालं. येथे त्यांनी बालपण घालवले. इतर राज्य, संस्थान त्यांच्या नावाने ओळखल जातं. पण, शिवाजी महाराजांनी जे राज्य उभे केलं ते हिंदवी स्वराज्य रयतेच राज्य होते. भोसल्यांचे नव्हतं म्हणून ते वेगळं आहे. सर्जिकल स्ट्राईकची चर्चा आता होते पण या देशांतील पहिला सर्जिकल स्ट्राईक छत्रपती शिवाजी महाराजांनी लाल महालात केला होता, असे म्हणत शरद पवारांनी अप्रत्यक्षपणे मोदींना टोला लगावला.
आपण लोकमान्यांचे स्मरण करण्यासाठी जमलो आहोत. लोकमान्यांचा सुरूवातीचा काळ पुण्यात गेला. ब्रिटीशांच्या गुलामगिरीतून बाहेर पडायचं असेल तर सर्वसामान्य माणसांना जागं करायचं म्हणून मोठ शस्त्रं वापरलं ते म्हणजे पत्रकारिता होय. केसरी, मराठासारखी वृत्तपत्रे सुरू केली. केसरीचा अर्थ सिंह, असेही त्यांनी म्हंटले आहे.
इंडियन नॅशनल कॉंग्रेसची स्थापना झाली होती. पहिलं अधिवेशन पुण्याऐवजी मुंबईला झालं. पत्रकारिता दबावातून मुक्त झाली पाहिजे, असं टिळक नेहमी म्हणायचे. ते जहाल गटाचे नेते होते. लोकमान्यांचं योगदान शिवजन्मोत्सव करण्यात मोठे आहे. स्वराज्याचं आंदोलन त्यांनी उभं केलं. स्वातंत्र्याची दोन युग एक टिळक युग आणि दुसरं गांधी युग, असे म्हणत शरद पवारांनी संभाजी भिडेंच्या विधानाचा समाचार घेतला आहे.