करियर म्हणून राजकारण का निवडलं? शरद पवारांनी सांगितले गुपित
बारामती : बारामतीत विद्या प्रतिष्ठानमधील गदिमा सभागृहात आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी विद्या प्रतिष्ठान येथे युवा महोत्सवास उपस्थिती लावली आहे. यावेळी ते विद्यार्थ्यांशी साधणार संवाद साधत असून त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देत आहेत. यादरम्यान त्यांनी राजकीय प्रवासामधील लातूर भूकंप, मुंबई बॉम्बस्फोट सारख्या महत्वपूर्ण घडामोडीही सांगितल्या.
एका विद्यार्थ्यांने त्यांना करियर म्हणून राजकारणच का निवडलं? नाहीतर दुसरे कोणते क्षेत्र निवडले असते, असा प्रश्न विचारला. यावर शरद पवार म्हणाले, हे सांगणे फार कठीण आहे. मला अभ्यास करणे आवडत नव्हते. मी एमएस शाळेत शिकत असताना माझे वडील बंधू आप्पासाहेब पवार यांनी प्रवरानगरला राहायला पाठवलं. त्यावेळी मी रयत शाळेत नववीला प्रवेश केला. गोव्यात पोर्तुगीज चळवळ चालू होती. या लढ्याला महाराष्ट्रातून विरोध होत होता. यादरम्यान गोळीबार झाला आणि हेगडेवार मृत्यूमुखी पडले. व शाळाही बंद पाडली. यानंतर हेगडेवार यांना श्रद्धांजली देत राजकारणाला सुरुवात झाली, असे त्यांनी सांगितले.
मुंबईत जेव्हा बॉम्बस्फोट झाला त्यावेळी मी मुख्यमंत्री होती. माझ्या ऑफिसमध्ये मला बॉम्बस्फोटचा आवाज आला होता. त्यावेळी मी तातडीने तिथे गेल. मी संरक्षण खात्यात देखील काम केलेले असल्याने बॉम्बस्फोटात काय असेल याची थोडीसी कल्पना आली होती. जिथे जिथे बॉम्ब स्फोट झाले होते. तिथे हिंदू लोकांची संख्या जास्त होती. याच्या पाठीमागे एकच हेतू होता एका समाजाला यातना होतील. याचा परिणाम म्हणून हिंदू-मुस्लिम दंगल होईल हे पाकिस्तानचे गणित होते. मी अपील केल्याने दोन दिवसांच्या आत मुंबई 100 टक्के कामात आली. त्यावेळी पूर्ण शांतता होती. त्यावेळी हिंदू-मुस्लीम दंगा होऊन दिला नाही. हे मोठे यश होते.
लातूरच्या भूकंपावेळी गणपती विसर्जन होते. कोयनेचे भूकंप संशोधन केंद्र आहे. त्यावेळी लातूरला भूकंपाची कंपने होत असल्याची माहिती मिळाली होती. तात्काळ मी त्याठिकाणी पोहचलो. भूकंपामुळे 9 हजार लोक मृत्यूमुखी पडले होते. आणि 1 लाखांपेक्षा जास्त घरे पडली होती. मी पंधरा दिवस लातूरला पुनर्वसन करण्यासाठी त्याठिकाणी राहिलो. आणि काही दिवसात लोकांचे त्याठिकाणी पुनर्वसन करून दिले. याची अमेरिकेने दखल घेत जागतिक बँकेने मला अमेरिकेला बोलवून व्याख्यान द्यायला सांगितले होते. जेणेकरून अशी परिस्थिती निर्माण झाली तर कशा पद्धतीने काम करता येईल.
तर, जेव्हा मी कृषिमंत्री पदाची शपथ घेतली. या कार्यक्रमानंतर मी घरी आल्यानंतर मला दोन तासांत पंतप्रधानांचा फोन आला. त्यावेळी एक फाईल पाठवली होती. यामध्ये देशाचा अन्नसाठा केवळ चार महिने पुरेल एवढाच होता. त्यामुळे अण्णासाठा निर्यात करण्याची मागणी त्या फाईलमधून केली होती. ही गोष्ट मात्र मला आवडली नाही. ब्राझीलमधून धान्य मागवायची कल्पना मला काही पटली नव्हती. परदेशातून धान्य आणण्यासाठी चार आठवडे लागतील. एवढ्या कालावधीत लोकांमध्ये दंगे निर्माण होण्याची शक्यता होती. हे लक्षात घेऊन शेतकऱ्यांच्या बाजाराला उत्पादनानुसार अधिक किंमत दिली. भारत एका वर्षाच्या आत गहू व तांदूळ निर्यात करणारा एक नंबरचा देश झाला. याचे कारण शेतकऱ्यांच्या घामाला योग्य किंमत दिली.
माझं लग्न झाल्यानंतर माझे सासरे विजय हजारे यांच्या संघात ते खेळत होते. यामुळे माझ्या लग्नात सगळे क्रिकेटर हजर होते. त्यानंतर माझी त्यांच्याशी जवळीक झाली. गरवारे संघटनेत वाद मिटवण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली होती. क्रिकेटच्या मैदानामध्ये मी कधी राजकारण होऊ दिले नाही. त्यामुळे अनेक खेळाडू माझ्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले. ज्यावेळेस भारत देश आशिया खंडामध्ये क्रिकेट एक नंबर झाला त्यावेळेस मी संघटनेचा राजीनामा दिला, असेही शरद पवार यांनी सांगितले.