विरोधकांच्या बैठकीनंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, जातीय तेढ निर्माण...

विरोधकांच्या बैठकीनंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, जातीय तेढ निर्माण...

भाजपविरोधात पाटणा येथे विरोधी पक्षांची बैठक पार पडली आहे. यामध्ये देशातील दिग्गज नेत्यांनी उपस्थिती लावली होती.
Published on

पाटणा : भाजपविरोधात पाटणा येथे विरोधी पक्षांची बैठक पार पडली आहे. यामध्ये देशातील दिग्गज नेत्यांनी उपस्थिती लावली होती. या बैठकीनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. समाजाच्या ऐक्यासाठी आज आपल्याला भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या साथीदारांचा सामना करावा लागणार आहे, असे म्हणत शरद पवारांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

विरोधकांच्या बैठकीनंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, जातीय तेढ निर्माण...
विरोधी पक्षांच्या बैठकीनंतर उद्धव ठाकरे म्हणाले; आमची विचारधारा वेगळी, पण...

आज आपण देशात रोज एक नवीन समस्या पाहत आहोत. ठिकठिकाणी जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. समाजाच्या ऐक्यासाठी आज आपल्याला भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या साथीदारांचा सामना करावा लागणार आहे. आपण एकत्रितपणे त्याचा सामना केला पाहिजे. काही मतभेद असतील किंवा इतर असतील, पण राष्ट्रहितासाठी आम्ही परस्पर समस्यांकडे दुर्लक्ष करून पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. मला विश्वास आहे की पाटण्यापासून ही सुरुवात देशात बदल घडवून आणण्यासाठी सुरू झाली आहे.

जयप्रकाशजींच्या नेतृत्वाखाली येथून एक संदेश दिल्याचे मला आठवते. त्यामुळे संपूर्ण देशात वेगळेच वातावरण निर्माण झाले होते. येथून अनेक चळवळी सुरू झाल्या आणि देशाच्या इतिहासात त्याचा स्वीकार झाला. आजच्या परिस्थितीत नितीशजींनी ही बैठक बोलावली आणि सगळे मित्र इथे आले. बैठकीत झालेल्या चर्चेत एकत्रितपणे काम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यातून आमची नवी वाट दाखवण्याचे काम सुरू झाले आहे. मला पूर्ण विश्वास आहे की देशातील जनता त्याला साथ देईल, असेही त्यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, विरोधी पक्षांची पुढील बैठक शिमल्यात होणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले की आम्ही 10 किंवा 12 जुलै रोजी शिमल्यात पुन्हा बैठक घेत आहोत ज्यामध्ये आम्ही एक समान अजेंडा तयार करू. आम्हाला प्रत्येक राज्यात वेगळ्या पद्धतीने काम करावे लागेल.भाजपला 100 जागांवर रोखू. सर्वांनी एकत्र राहिल्यास भाजपचा पराभव नक्कीच होईल, असा विश्वास खर्गेंनी व्यक्त केला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com