राष्ट्रवादी फोडणाऱ्यांना त्यांची जागा दाखवणार - शरद पवार
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस यांच्यासोबत हातमिळवणी करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यामुळे राज्यामध्ये मोठा राजकीय भूकंप झाला आहे. यावर राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.
याच पार्श्वभूमीवर आज कराडच्या प्रीती संगमावरुन शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला शरद पवार म्हणाले की, धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. एकोप्याने राहणाऱ्या समाजात भीती निर्माण करण्याच्या प्रयत्न आहे. अशा प्रवृत्तींविरोधात आपल्याला लढलं पाहिजे. लोकशाहीचा अधिकार जतन केला पाहिजे. देशभरातील विरोधी पक्षांची सरकार पाडण्याचे काम सुरु आहे. असे शरद पवार म्हणाले.
यासोबतच ते म्हणाले की, महाराष्ट्र पिंजून काढणार. फोडाफोडीच्या भाजपाच्या प्रवृत्तीला आपल्यातील काही लोक बळी पडले. राष्ट्रवादी फोडणाऱ्यांना त्यांची जागा दाखवणार. असे शरद पवार म्हणाले.