तुम्ही माझं वय झालंय म्हणताय, पण...; शरद पवारांचे धनंजय मुंडेंच्या बालेकिल्ल्यातून टीकास्त्र
बीड : धनंजय मुंडेंच्या बालेकिल्ल्यात आज शरद पवारांची तोफ धडाडली. यादरम्यान शरद पवारांनी अजित पवार गटावर जोरदार टीका केली. लोकशाहीमध्ये लोकांनी निवडून दिलेली सरकार पाडण्याचा उद्योग केला जातो. तुम्ही स्थिर सरकार देण्याची घोषणा करता आणि लोकांनी निवडून दिलेली सरकारी केंद्राची सत्ता वापरून उध्वस्त करता आहेत, असे टीकास्त्र त्यांनी सोडले आहे.
आज व्यासपीठावर काही लोक आहेत आमच्या सोबत राजकारणात नव्हते पण काहीतरी मुद्दा काढला आणि महिनोन्महिने त्यांना तुरुंगात टाकले. आणि विशेषतः या गोष्टी अधिक होत आहेत सत्तेचा गैरवापर करून लोकांना तुरुंगात डांबून कुणी या ठिकाणी वेगळे राजकारण करत असेल तर ठीक आहे तुम्ही आज करत आहेत पण एक दिवशी हे सामुदायिक शक्ती एक संघ झाली तर हे असले राजकारण उलथून टाकण्याचे कधीही वेळ लागणार नाही आणि ते करायला आम्ही सर्वजण तयार झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शरद पवारांनी दिला आहे.
जिल्ह्याच्या नेत्याचे काय झालंय त्यांना माहिती आहे. एका नेत्याने सांगितले एक कुणीतरी आमचा सहकारी हा पक्ष सोडून गेला. चौकशी केली काय झाले. कालपर्यंत ठीक होता काय माहिती त्यांना कोणीतरी काय सांगितलं. त्यांना सांगितलं पवार साहेबांचा आता वय झालंय आणि त्यामुळे आपल्या भवितव्याचा विचार करायचा असेल तर दुसरा नेता निवडला पाहिजे.
आता एवढेच सांगतो तुम्ही माझं वय झालंय म्हणताय तुम्ही माझं काय बघितलं त्यामुळे तुम्हाला सामुदायिक शक्ती उभी केल्यानंतर काय होते एकदा या जिल्ह्याच्या मातृभूमीत येऊन आम्ही केले होते इथल्या तरुण पिढीच्या मदतीने एकेकाळी केले होते आता ठीक आहे तुम्हाला सत्तेच्या बाजूने जायचं आहे तर जा पण निदान ज्यांच्याकडून आयुष्यात काही घेतलं असेल त्यांच्याबद्दल थोडी माणुसकी तरी ठेवायचा प्रयत्न करा आणि नाही तर लोक तुम्हाला योग्य प्रकारची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, अशी जोरदार टीका शरद पवारांनी धनंजय मुंडेंवर केली आहे.