Sharad Pawar: झेड प्लस सुरक्षा न घेण्याबाबत पवार निर्णय घेण्याची शक्यता
येत्या काही महिन्यात महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस शदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना केंद्र सरकारनं ‘झेड प्लस’ सुरक्षा प्रदान केली आहे. पवारांना मिळत असलेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहखात्यानं हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे. सध्या शरद पवार यांना राज्याची झेड प्लस सुरक्षा आहे. केंद्रानं शरद पवार यांना झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय घेतल्यानंतर विविध चर्चा सुरू झाल्या.
केंद्रीय गृहमंत्रालयानं केंद्रीय राखीव पोलीस दलाला (सीआरपीएफ) शरद पवार यांना झेड प्लस सुरक्षा देण्यास सांगितलं आहे. शरद पवार हे देशातील महत्वाचे नेते आहेत. या कामासाठी 55 सशस्त्र CRPF जवानांची तुकडी तैनात करण्यात येणार आहे. ते शरद पवार यांच्या ताफ्यात तैनात असणार आहेत.
झेड प्लस सुरक्षेवर माध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले, सुरक्षा वाढी संदर्भात काही माहिती नाही. काल माझ्याकडे केंद्रीय गृहखात्याचे अधिकारी आले होते. 3 लोकांसाठी झेड सिक्युरिटीचा निर्णय केंद्राने घेतला आहे. यामध्ये आरएसएस प्रमूख मोहन भागवत आणि देशाचे गृहमंत्री आणि तीसर नाव माझं आहे. हे कशासाठी हे मला माहिती आहे. कदाचित निवडणुका आहेत.एकंदरीत पाहिलं तर ओथेंटिक माहिती मिळवण्याची व्यवस्था असू शकते. नक्की काय ते मला माहिती नाही. होम मिनिस्ट्रीमध्ये जे कोणी जबाबदार आहेत, त्यांच्याशी संवाद साधणार आहे, माहिती घेणार आहे आणि नंतर त्याच्या पुढे काय करायचं ते ठरवणार आहे असे शरद पवार म्हणाले.