चिन्हावरुन संघर्ष? निवडणूक आयोगात शरद पवार गटाचे उत्तर दाखल

शिवसेनेपाठोपाठ आता राष्ट्रवादीत पक्षाची चिन्हाची लढाई सुरू होणार आहे. दोन्ही बाजूची उत्तरं ऐकल्यानंतर आयोग किती वेगाने सुनावणी करणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.

मुंबई : अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्हावर दावा केला होता. याप्रकरणी अजित पवार गटाने निडणूक आयोगात याचिका दाखल केली होती. या याचिकेनंतर शरद पवार गटाला आयोगाने नोटीस दिल्याचे समजत आहे. यावर शरद पवार गटाने उत्तर दाखल केले असून सर्वांचे दावे फेटाळले आहेत. यासह मंत्र्यांशिवाय अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांविरोधात सुद्धा अपात्रतेची याचिका दाखल केली आहे.

नऊ मंत्र्यांशिवाय 31 आमदारांविरोधातही अपात्रतेची याचिका शरद पवार गटाच्या वतीने निवडणूक आयोगात दाखल करण्यात आली आहे. यामुळे शिवसेनेपाठोपाठ आता राष्ट्रवादीत पक्षाची चिन्हाची लढाई सुरू होणार आहे. दोन्ही बाजूची उत्तरं ऐकल्यानंतर आयोग किती वेगाने सुनावणी करणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com