शरद पवार गटाला नवं नाव मिळालं; नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांचा की शरद पवारांचा यावर निवडणूक आयोगामध्ये सुनावणी झाली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांचा की शरद पवारांचा यावर निवडणूक आयोगामध्ये सुनावणी झाली. केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्हाबाबतीत अजित पवार गटाच्या बाजूने निकाल दिला. राष्ट्रवादीचं घड्याळ पक्ष, चिन्ह अजित पवार गटाला मिळालं.

त्यानंतर आता शरद पवार गटानं आपलं नाव आणि चिन्ह सांगावं असा आदेश निवडणूक आयोगाने दिला होता. शरद पवार गटाकडून तीन नावांचे पर्याय निवडणूक आयोगाला सादर करण्यात आले होते. त्यापैकी एक नाव निवडणूक आयोगाने जाहीर केले. त्यानंतर शरद पवार गटाला नवं नाव मिळालं आहे. आता शरद पवार गटाला नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार असे ओळखले जाणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com