पंतप्रधान मोदींचं 'ते' विधान क्लेशदायक : शरद पवार

पंतप्रधान मोदींचं 'ते' विधान क्लेशदायक : शरद पवार

पंतप्रधान मोदींच्या टीकेचा शरद पवारांनी घेतला समाचार
Published on

मुंबई : महिलांचे सक्षमीकरण करण्याचा काँग्रेसचा हेतू कधीच नव्हता, तुम्ही तुमच्या मनापासून नाही तर सर्व महिलांच्या दबावामुळे विधेयकाच्या समर्थनार्थ आला आहात, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमध्ये केली होती. पंतप्रधानांच्या या विधानाचा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी चांगलाच समाचार घेतला. यावेळी त्यांनी महिलासंबंधित निर्णयांची यादीच वाचून दाखवली.

पंतप्रधान मोदींचं 'ते' विधान क्लेशदायक : शरद पवार
सत्ता प्राप्तीसाठी खाली केलेले खोके पुन्हा भरण्यासाठी पेपर फुटले? वडेट्टीवारांचा खोचक सवाल

देशाच्या पंतप्रधानांनी भाषण देत असताना संसदेत महिलांच्या आरक्षणासंबंधित निर्णय एकमताने घेतला. त्या निर्णयाबाबत दोन सदस्य सोडले तर कोणी विरोध केला नव्हता. फक्त एक सूचना होती की घटनात्मक दुरुस्तीचा निर्णय आपण घेतोय. शेवटी एकमताने निर्णय व्हावा घटनादुरुस्ती आहे पण निर्णय तसा झाला. पंतप्रधानांनी असं स्टेटमेंट करणे क्लेशदायक, अशी टीका शरद पवारांनी केली आहे.

1993 साली माझ्याकडे महाराष्ट्राची सूत्र होती. देशात राज्य महिला आयोग स्थापन करणारे आपलं राज्य पहिले आहे. मी मुख्यमंत्री असताना महिला बालकल्याण खातं आणले. नगरपालिका, नगरपरिषद यासाठी घटनादुरुस्तीचा कायदा सुधारला. महिला संघटनेबाबत सांगण्यासाठी एक संग्रह आयोजित केले होते. देशात पहिले महिला धोरण जाहीर केले आणि या धोरणांतर्गत 30 टक्के आरक्षण करण्यात आलं, अशाप्रकारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. तरीही या देशात कोणी असा विचार केला नाही असं मोदी म्हणतात ते रास्त नाही, असे त्यांनी म्हंटले आहे.

माझ्याकडे संरक्षण खाते असतं तिन्ही दलात 18 टक्के महिलांना स्थान दिलं. आता तुम्ही पाहत असाल परेडमध्ये नेतृत्व भगिनी करत असते. महिलांना एअरफोर्समध्ये घेण्याचा निर्णय संरक्षण मंत्री असताना घेतला होता. तेव्हा महिलांना कुणी सैन्यात घ्यायला तयार नव्हते. महिलांना दलात सहभागी करून घ्यावे असावं, असा प्रस्ताव ठेवला. तेव्हा कोणी तयार झाले नाही चौथ्या बैठकीमध्ये मी सांगितले की हा अधिकार माझं आहे आणि मी हा निर्णय घेत आहे त्यामुळे तो निर्णय झाला. हे सगळे निर्णय काँग्रेस काळात झाले. दुर्दैवाने पंतप्रधानांना कुणी सांगितले नाही, असा टोलाही शरद पवारांनी मोदी यांना लगावला आहे.

दरम्यान, कांदा खरेदीबाबतचे शिष्टमंडळ मला भेटले. केंद्राने निर्यातीवर 40 टक्के ड्युटी लावले. यावर शेतकरी आणि व्यावसायिक यांच्यावर विपरीत परिणाम झाला आहे. संध्याकाळी बैठक होणार आहे. कांद्याची 40 टक्के ड्युटी ही जास्त आहे त्यांनी ती परत घ्यावी अशी माझी विनंती राहील, असेही शरद पवारांनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com