Sharad Pawar : मीही अनेक शपथा घेतल्या, पण राज्यपालांनी माझ्या तोंडात पेढा भरवला नाही

Sharad Pawar : मीही अनेक शपथा घेतल्या, पण राज्यपालांनी माझ्या तोंडात पेढा भरवला नाही

शरद पवार यांचा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना टोमणा
Published on

मुंबई : मी पण वेगवेगळ्या शपथा घेतल्या. पण, कोणत्याही राज्यपालांनी माझ्या तोंडात पेढा भरवला नाही, असा टोमणा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांना मारला आहे. त्यांनी आज पत्रकांराशी संवाद साधला.

Sharad Pawar : मीही अनेक शपथा घेतल्या, पण राज्यपालांनी माझ्या तोंडात पेढा भरवला नाही
उध्दव ठाकरेंना अमित ठाकरेंची साथ; मनसे भाजप येणार आमने-सामने?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बंडाळीनंतर दहा दिवसांनी मुंबईत परतल्यानंतर त्यांनी सागर बंगला येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यानंतर फडणवीस आणि शिंदे यांनी राजभवनावर राज्यापालांची भेट घेत सत्ता स्थापनेचा दावा केला. यावेळी राज्यपालांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना पेढा भरवला व पुष्पगुच्छ दिले. नेमके यावरुनच शरद पवारांनी राज्यापाल भगत सिंह कोश्यारींवर निशाणा साधला आहे.

मी पण वेगवेगळ्या शपथा घेतल्या. पण, कोणत्याही राज्यपालांनी माझ्या तोंडात पेढा भरवला नाही. कधीही फुलांचा गुच्छ दिला नाही, अशी टीका टोमणा शरद पवारांनी राज्यपाल यांच्यावर केला आहे. तसेच, आमदारांचा सुरत -गुवाहाटी-गोवा हा प्रवास सुखकर होण्यासाठी 'बरीच काळजी' घेतली असं सांगतात, असेही शरद पवार म्हंटले आहेत.

Sharad Pawar : मीही अनेक शपथा घेतल्या, पण राज्यपालांनी माझ्या तोंडात पेढा भरवला नाही
Assembly Speaker Election : शिवसेनेचा व्हिप बंडखोरांना होणार लागू? एकनाथ शिंदे म्हणाले...

तर, शरद पवार यांनी पक्षाचा व्हिप पाळावा लागतो. पक्ष म्हणजे विधिमंडळ पक्ष आणि पक्ष संघटना, असे त्यांनी सांगितले आहे. दरम्यान, विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीची प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यासाठी भाजपकडून युवा आमदार राहुल नार्वेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांनी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आपला अर्ज दाखल केला आहे. या निवडीसाठी शिवसेनेने व्हिप जारी केला आहे. परंतु, एकनाथ शिंदे यांनी आम्ही व्हिप पाळणार नसल्याचे स्पष्ट सांगितले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com