शरद पवार आणि बच्चू कडू यांची आज भेट होणार आहे. बच्चू कडू यांच्या घरी आज शरद पवार जाणार असल्याची माहिती मिळत आहे. यावरुन राजकीय वर्तुळात चांगल्याच चर्चा रंगल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी माध्यमांशी संवाद साधला.
बच्चू कडू म्हणाले की, एक मदतीची जाणीव म्हणून आम्ही त्यांना फोन केला होता. इथून चालले आहात तर घरी या. हे आमंत्रण त्यांनी स्विकारलं. जो पर्यंत शिंदे साहेब मुख्यमंत्री आहेत. तोपर्यंत कोणताही निर्णय घेतला जाणार नाही. शिंदे साहेब नसले तर मग कदाचित घेऊ. शरद पवार एवढे मोठे नेते आहेत त्यांचा आदरसत्कार आपण केला पाहिजे. असे बच्चू कडू म्हणाले.
शरद पवार आज बच्चू कडूंच्या निवासस्थानी जाणार आहेत. शरद पवारांना चहासाठी निमंत्रण देण्यात आल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले.