दोन वेळा उद्धव ठाकरे राजीनामा देण्याच्या तयारी पण पवारांनी रोखले
राज्यातील राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोशल मीडियावर येऊन पदाचा राजीनामा देणार होते. परंतु, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ठाकरेंना असा हा निर्णय घेण्यापासून रोखले. शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना एकदा नाही तर दोनदा राजीनामा देण्यापासून
आमदार सुरतला गेल्याच्या दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे राजीनामा देण्याचा विचार करत होते. उद्धव ठाकरेंनी अधिकाऱ्यांची बैठकही बोलावली होती. पण पुन्हा एकदा शरद पवारांनी मध्यस्थी केली. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांची इच्छा असेल तर, मी मुख्यमंत्रीपद सोडण्यास तयार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून गेल्या आठवड्यात सांगितले होते. तसेच शिवसैनिकांनाही मी नको असेल तर शिवसेना पक्षप्रमुखपद सोडण्यासदेखील तयार आहोत. मात्र, माझ्या शिवसैनिकांनी आणि त्या आमदारांनी मला हे समोरासमोर येऊन सांगावे असे ठाकरे म्हणाले होते.
आज सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर महाविकास आघाडी सरकारला धक्का बसला. त्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे राजीनामा देण्याच्या तयारीत होते. संध्याकाळी फेसबुक लाईव्हद्वारे त्यांची घोषणा करणार होते. परंतु शरद पवार यांनी त्यांना रोखले.
भाजपच्या बैठका
सर्वोच्य न्यायालयाच्या निकालानंतर राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. सर्व पक्षीय बैठकांचा जोर वाढला आहे. मुंबईत भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाली. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्याबाबत चर्चा झाली. प्रसाद लाड, आशिष शेलार, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे यांच्यासह भाजपचे महत्वाचे नेते या बैठकीला उपस्थित आहेत.