राष्ट्रवादीतील फुटीनंतर पहिल्यांदा एकाच मंचावर दिसणार शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे
मुंबई: राज्याच्या राजकारणात सध्या प्रचंड गदारोळ सुरू आहे. शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर त्यानंतर अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडली. या फुटीमुळे अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरून देखील दोन्ही गटात वाद सुरू आहे. दरम्यान आता या फुटीनंतर पहिल्यांदाच ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे हे एकाच व्यासपीठावर येणार आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.
या कार्यक्रमासाठी तिन्ही नेते एकत्र येणार
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे एकत्र दिसणार आहेत. दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथील विद्या प्रतिष्ठान संस्थेने उभारलेल्या अनंतराव पवार इंग्लिश मीडियम स्कूलच्या नव्या वास्तूचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. याच कार्यक्रमाला पवार कुटुंबीय उपस्थित राहणार आहेत.