उध्दव ठाकरेंनी मनाचा मोठेपणा दाखवायला हवा होता; शंभूराज देसाईंचा निशाणा

उध्दव ठाकरेंनी मनाचा मोठेपणा दाखवायला हवा होता; शंभूराज देसाईंचा निशाणा

शिवसेनेचे (ठाकरे गटाचे) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी शरद पवारांचे आभार मानले. परंतु, राज ठाकरे यांचे नाव न घेतल्याने शंभूराज देसाई यांनी टीका केली.
Published on

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही अंधेरी निवडणूक बिनविरोध करावी, अशी मागणी केली होती. यासाठी शिवसेनेचे (ठाकरे गटाचे) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी शरद पवारांचे आभार मानले होते. परंतु, राज ठाकरे यांचे नाव न घेतल्याने उध्दव ठाकरेंवर आता टीका करण्यात येत आहे. उध्दव ठाकरेंनी मनाचा मोठेपणा दाखवायला हवा होता, असा निशाणा बाळासाहेबांची शिवसेनेचे नेते शंभूराज देसाई यांनी साधला आहे.

शंभूराज देसाई म्हणाले की, पवार यांनी जी अंधेरी पोटनिवडणूकमध्ये भूमिका घेतली. 1983 सालीही बाळासाहेब देसाई यांच्या निवडणुकीवेळी पवार यांनी त्यावेळी अशी भूमिका घ्यायला हवी होती. पवार यांची भूमिका विसंगत पाहायला मिळात आहे. बाळासाहेब यांच्या निवडणुकीमध्ये एक न्याय दुसऱ्याला वेगळा न्याय, असे मला वाटते. तसेच, उध्दव ठाकरेंनी शरद पवार यांचे आभार मानले. मात्र, राज ठाकरे यांचेही आभार मानायला हवे होते. इतका मोठेपणा दाखवायला हवा होता, असा टोला त्यांनी उध्दव ठाकरेंना लगावला आहे.

बहुचर्चित महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याचा पुन्हा तपास सुरू होण्याची शक्यता आहे. यामुळे आता विरोधी पक्षनेते अजित पवार अडचणीत वाढणार आहे. यावर बोलताना ते म्हणाले, राज्य सरकारने याबाबत कोणतीही भूमिका स्पष्ट केली नाही. जो पर्यंत उघड भूमिका स्पष्ट होत नाही. तोपर्यंत मंत्री म्हणून भाष्य करणे योग्य नाही, असे म्हणत शंभूराज देसाई यांनी उत्तर देणे टाळले.

तर, रविवारी शिवसेनेने (ठाकरे गट) सामना संपादकीयमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर 4-5 बंगल्यावर ताब्यात घेतल्याचा आरोप केला होता. या आरोपांना शंभूराज देसाई यांनी उत्तर दिले आहे. ज्वलंत हिंदुत्वाचे विचार, मुंबईचे प्रश्न सोडविण्यासाठी म्हणून उपक्रम सुरु केला आहे. शिंदे, फडणवीस आणि भाजपावर टिका करणारे ते वर्तमानपत्र आहे. याकडे बघण्यापेक्षा, किती जिल्ह्यात गेले, गावात गेले हे पाहावे. शिंदे साहेब 18 तास काम करणारे मुख्यमंत्री आहे. मोठ्या प्रमाणवार लोक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला येत असतात. लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून पर्यायी व्यवस्था केली आहे, असे शंभूराज देसाईंनी सांगितले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com