ठाकरे सरकारमध्ये विनायक राऊतांनी नाच्या म्हणून काम केलं; शहाजी बापू पाटलांचा टोला

ठाकरे सरकारमध्ये विनायक राऊतांनी नाच्या म्हणून काम केलं; शहाजी बापू पाटलांचा टोला

शहाजी बापू पाटलांचे विनायक राऊतांना प्रत्युत्तर
Published on

पंढरपूर : मला सोंगाड्याची उपमा देणाऱ्या शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी मागील सरकारमध्ये नाच्या म्हणून काम केलं का?, असं प्रत्युत्तर शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी दिलं. ते पंढरपुरात बोलत होते.

विनायक राऊत यांनी रविवारी शहाजीबापू पाटील यांच्या मतदारसंघात मेळावा घेतला. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारची खिल्ली उडवली. एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांचं सरकार म्हणजे काळू-बाळूचा तमाशा आहे. तर शहाजीबापू पाटील हे त्यातील सोंगाड्या आहेत, अशी टीका केली आहे. यावर शहाजी बापू पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

काय म्हणाले शहाजी बापू पाटील?

आज सांगोला येथे उरल्या-सुरल्या शिवसैनिकांत खासदार राऊत यांनी सभा घेतली. पन्नास-साठ टुकार पोरासह सभा घेण्याची वेळ आली. मला सोंगाड्या म्हणणाऱ्या राऊत यांनी मागच्या सरकारमध्ये काय नाच्या म्हणून काम केले का ? पावसाळा संपला की कोकणात सात तालुक्यात जाऊन सभा घेणार आहे. सडतोड उत्तर दिले जाईल. माझी भाषणं ऐकण्यासाठी राऊत यांनी कानातला मळ काढून ठेवावा, असा टोला त्यांनी राऊतांना लगावला आहे

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com