काय ही बारामती, काय हे कृषी प्रदर्शन, महाराष्ट्रातील शेतकरी एकदम ओक्के...; शहाजी बापू पाटलांचा खास डायलॉग
बारामती : शिंदे गटाचे नेते शहाजी बापू पाटील यांनी आज बारामती कृषी प्रदर्शनाला उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी आपल्या खास शैलीत कृषी प्रदर्शनाचे कौतुक केले. काय ही बारामती, काय हे कृषी प्रदर्शन, काय राजेंद्र पवारांचं नियोजन आणि सगळं काय बघितलं.. महाराष्ट्रातील शेतकरी एकदम ओक्के..., असे त्यांनी म्हंटले आहे. तसेच, ८ ते ९ वर्षात माझ्यात आणि पवार कुटुंबात कटुता नाहीये, असेदेखील स्पष्ट केले आहे.
बारामतीत पंढरपूरचे आमदार औदुंबर पाटील यांच्यासोबत मी १९७१ साली आलो. मी हायस्कूलमध्ये शिकत असताना बारामतीत आलो. त्यावेळी मी पहिल्यांदा अप्पासाहेब पवार व शरद पवार यांना पहिल्यांदा पाहिलं.
मी बारामतीत सातत्याने वेगवेगळ्या कार्यक्रमाने संपर्कात असतो. २०१३ सालापर्यंत मी ज्या काँग्रेस चळवळीत काम केले. त्या चळवळीत शरद पवार व सुशील कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले. २०१३ नंतर महाराष्ट्राच्या राजकारणात होणारे बदल व आघाड्या व्हायला लागल्या. यावेळी शिवसेना हा एकमेव पर्याय मला उरला. त्यामुळे एवढ्या ८ ते ९ वर्षात माझ्यात आणि पवार कुटुंबात कटुता नाहीये.
मंत्रिमंडळात समावेश होण्याबाबत शहाजी पाटील म्हणाले की, मी राजकारणात बालपणापासून आहे. कारण ही माझी आवड आहे आणि त्यामुळे राज्यात १९७२ सालच्या मंत्रिमंडळापासूनचे फेरबदल हे बारकाव्याने मी बघत आलो. यादी जाहीर होऊन देखील मुख्यमंत्री किंवा त्यांच्या कार्यालयाचा जोपर्यंत फोन येत नाही. तोपर्यंत सगळ्यांनी स्वप्न बघायची असतात. स्वप्न बघायला कुणाचे बंधन नसते. त्याला पैसे लागत नाही. ज्याच्या नशिबात आहे त्याला मिळणार आहे. ज्याच्या नाशिबात आहे त्यांन राबून काम करायचं. आणि कुठल्याही पक्षाशी प्रामाणिक काम करत राहायचं, असे त्यांनी सांगितले.
बारामतीत राजकीय बैठक असून राजकीय बैठकीसाठी मला यावच लागणारच का यायचं नाही. आणि त्यात काही नाही दादा खवळल तर सांगेल आहो यावं लागतं नाय तर पक्षातून काढून टाकत्यात. त्यामुळे काम करायला लागतंय, असा मिश्कील विधान त्यांनी केले आहे.