'शरद पवारांच्या सांगण्यावरून उद्धव ठाकरेंनी माझं तिकीट कापण्याची तयारी केली होती'

'शरद पवारांच्या सांगण्यावरून उद्धव ठाकरेंनी माझं तिकीट कापण्याची तयारी केली होती'

शिंदे गटाचे नेते शहाजी बापू पाटील यांचा मोठा गौप्यस्फोट
Published on

अभिराज उबाळे | पंढरपूर : राज्यात राजकीय वातावरण प्रचंड तापले असून नवनवीन खुलाशांनी राजकारण ढवळून निघत आहे. अशात, शिंदे गटाचे नेते शहाजी बापू पाटील यांनी ठाकरे गटाचे नेते उध्दव ठाकरे यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सांगण्यावरून उद्धव ठाकरेंनी माझं तिकीट देखील कापण्याचे तयारी केली होती, असा मोठा आरोप शहाजी बापू पाटील यांनी केला आहे. पंढरपूरात ते माध्यामांशी बोलत होते.

'शरद पवारांच्या सांगण्यावरून उद्धव ठाकरेंनी माझं तिकीट कापण्याची तयारी केली होती'
अजित पवार मांडलिक म्हणून काम करतील असं...; राऊतांची दमानियांच्या दाव्यावर प्रतिक्रिया

शहाजी बापू पाटील यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण यांच्याकडून झालेल्या हालचालींचा मोठा गौप्यस्फोट केला आहे. माझ्यासह आमदार महेंद्र दळवी, थोरवे, योगेश कदम, अनिल बाबर, प्रकाश आबिटकर यांच्यासह ४० जणांचे मतदार संघ धोक्यात आणायचे काम काँग्रेस, राष्ट्रवादीकडून सुरू होते. पराभूत उमेदवाराच्या पत्रावर ते निधी देऊ लागले होते, असा दावा त्यांनी केला आहे.

तर अध्यक्ष शरद पवार यांच्या सांगण्यावरून उद्धव ठाकरेंनी माझं तिकीट देखील कापण्याचे तयारी केली होती, असा आरोप शहाजी बापू पाटील यांनी उध्दव ठाकरेंवर केला आहे. मात्र, आता शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात रेकॉर्ड ब्रेक निधी मिळत आहे. सांगोला आता बारामतीची स्पर्धा करणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, मध्यंतरी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनीही सत्तांतराबाबत मोठा खुलासा केला होता. 2019 पासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंत्री तानाजी सावंत यांच्यात सत्ता परिवर्तन करण्यासाठी 150 बैठका झाल्या होत्या. देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशावरून मी राज्यातील पहिले बंड केले आणि भाजप शिवसेनेची सत्ता आणली. फडणवीस यांच्यासोबत मी बैठका घेत होतो, असे सावंत यांनी म्हंटले होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com