उद्धव ठाकरेंकडून स्वबळाच्या चाचपणीचा जोर? मातोश्रीवर बैठकांचा धडाका
मुंबई : शरद पवार आणि अजित पवार यांच्या गुप्त भेटीने सध्या महाविकास आघाडीमध्ये अस्वस्थता आहे. अशातच, ठाकरे गटाकडून स्वबळाची चाचपणी करण्यात येत आहे. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये लोकसभा मतदारसंघाच्या आढावा बैठकीचा धडाका सुरु आहेत. पहिल्या टप्प्यातील बैठका पार पडल्या आहेत. आता दुसरा टप्प्यातील बैठका मातोश्रीवर पार पडणार आहे.
उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये दुसऱ्या टप्यातील 16 लोकसभा मतदारसंघाच्या आढावा बैठका मातोश्रीवर होणार आहेत. पहिल्या टप्प्यात 16 लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला असून प्रत्येक विधानसभा मतदारसंघाची सुद्धा यावेळी माहिती ठाकरेंनी घेतली. मराठवाडा आणि विदर्भाचा आढावा 22 ते 26 ऑगस्ट दरम्यान ठाकरेंकडून घेतला जाणार आहे. बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर, जालना, संभाजीनगर, बीड, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा या मतदार संघाचा आढावा घेण्यात येणार आहे.
कसा असणार दुसऱ्या टप्प्यातील लोकसभा मतदारसंघ निहाय आढावा बैठकीचा कार्यक्रम?
22 ऑगस्ट
दुपारी साडे 12 - बुलढाणा
दुपारी 3 - अकोला
दुपारी 4 - अमरावती
दुपारी 5 - वर्धा
23 ऑगस्ट
दुपारी साडे 12- रामटेक
दुपारी 3 - नागपूर
दुपारी 4 - भंडारा- गोंदिया
दुपारी 5 - गडचिरोली चिमूर
24 ऑगस्ट
दुपारी साडे 12- चंद्रपूर
दुपारी 3 -जालना
दुपारी 4 - संभाजीनगर
दुपारी 5- बीड
25 ऑगस्ट
दुपारी साडे 12- धाराशिव
दुपारी 3 -लातूर
दुपारी 4 -सोलापूर
दुपारी 5 -माढा