नाशिक पदवीधर निवडणुकीला वेगळे वळण, ऐनवेळी सत्यजित तांबेंनी भरला उमेदवारी अर्ज
राज्यात सध्या प्रचंड खलबत सुरु आहे. तर याच गोंधळा दरम्यान दुसरीकडे राज्यात विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांतील पाच जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. त्यासाठी सर्वच पक्षाकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. परंतु, नाशिकच्या जागेबाबत मोठा पेच निर्माण झाला होता. काँग्रेसने विद्यमान आमदार सत्यजीत तांबे यांच्याऐवजी त्यांचे डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र, अर्ज दाखल करताना ऐनवेळी काँग्रेसने सत्यजीत तांबे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेसकडून वेळेत एबी फॉर्म न मिळाल्याने सत्यजीत तांबे हे महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार असणार आहेत. त्यामुळे या निवडणुकीला वेगळे वळण निर्माण झाले आहे.
काल झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये नाशिक पदवीधर विधान परिषदेची जागा ही काँग्रेसला देण्यात आली होती. काँग्रेसने या निवडणुकीत पुन्हा एकदा डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर केली. काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे उमेदवार सुधीर तांबे असतील हे स्पष्ट झाले होते. मात्र, भाजपने आजपर्यंत उमेदवार जाहीर केलेला नाही. तर, दुसरीकडे सुधीर तांबे यांचे चिरंजीव आणि युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष सत्यजीत तांबे यांना भाजपकडून उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर आता ऐनवेळी काँग्रेसने सत्यजीत तांबे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला.