Satyajeet Tambe : अमित ठाकरेंच्या प्रकरणावर काय म्हणालं सत्यजित तांबे?
मुंबई: सिन्नर तालुक्यातील समृद्धी महामार्गावरील टोल नाका मनसेच्या कार्यकर्त्यांनी फोडला होता. यावरुन राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. अशातच आमदार सत्यजित तांबे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
राजकीय नेत्यांनी सार्वजनिक जीवनामध्ये वावरणाऱ्या ठिकाणी जबाबदारीने कसं वागले पाहिजे हा एक मुद्दा तर टोलनाक्यावरील कर्मचारी कशा पध्दतीने अरेरावी करतात हाही मुद्दा आहे. टोल नाक्यावरचे कर्मचारी लोकांशी कसे वागतात, त्यासोबत कशा पद्धतीने तिथे भ्रष्टाचार चाललेला आहे, हे दोन्ही मुद्दे गंभीर आहेत, असे वक्तव्य सत्यजित तांबे यांनी केले आहे.
मी गेल्या 22 वर्षापासून सार्वजनिक जीवनामध्ये काम करत आहे. 10 जिल्हा परिषदामध्ये सदस्य होतो. आणि आता आमदार म्हणून काम करत आहे. या 22 वर्षांमध्ये मी एकही टोल चुकवलेला नाही. विकासामध्ये टोलची भूमिका महत्त्वाची आहे. पैसे गोळा करावे लागणार आहेत, त्याशिवाय विकास होऊ शकणार नाही. टोलमध्ये नवीन तंत्रज्ञान आणलं तर ट्रॅफिकवर होणारा परिणाम कमी होईल, असे प्रतिक्रिया सत्यजित तांबे यांनी म्हंटले आहे.