Satej Patil: सतेज पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल; म्हणाले...
छत्रपती शिवाजी महाराज यांचा 35 फुटांचा कोकणातील पुतळा कोसळल्याचं धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. यामागचं कारण अजून कळू शकलेलं नाही. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात या पुतळ्याचं मोदींच्या हस्ते दिमाखात अनावरण पार पडलं होतं. नौदल दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याला सलाम म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण मध्ये पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता. याच पार्श्वभूमीवर सतेज पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सगळ्या एकूण प्रक्रिया बघितल्यावर लक्षात येतं की योग्य ती सावधगिरी घेतली गेलेली नाहीत. फक्त उद्घाटनाची घाई म्हणून अत्यंत अनुभव नसणाऱ्या व्यक्तीमत्वाला हे याठिकाणी काम देण्यात आलं. अगदी कमी वेळामध्ये हे काम पूर्ण करुन उद्घाटन करायचं आहे. फक्त या पद्धतीचं छत्रपती शिवाज महाराजांच्या बाबतीत देखील हे सरकार वागतंय हे दुर्देव आहे असे सतेज पाटील म्हणाले.
दरम्यान नौदलाने छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या किल्ले सिंधुदुर्गच्या साक्षीने 4 डिसेंबर 2023 नौदल दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि यासाठी राजकोट किल्ल्यावर नौदल आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराजांचा 35 फूट उंच पूर्णाकृती पुतळा उभरला होता. परंतु तो वर्षभराच्या आतच कोसळल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.