Mangesh Sasane: जरांगेंच्या उपोषणाला ससाणेंचं उपोषणाने उत्तर; ओबीसी आरक्षण बचावासाठी उपोषण
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे. मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सहाव्यांदा उपोषण सुरु केलं आहे. मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे, आंदोलन काळातील आंदोलकावरील गुन्हे सरसकट मागे घ्यावे, यासह अन्य मागण्यांसाठी मनोज जरांगे यांच उपोषण सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर आता मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला प्रतिउत्तर म्हणून मंगेश ससाणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे उपोषण सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.
तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला मंगेश ससाणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे म्हणाले की, काल संध्याकाळी तहसीलदार आले होते त्यांनी विचारपूस केली आणि निवेदन तुमच्या मागण्या काय आहेत आणि तहसीलदारांना आमच्या प्राथमिक स्वरुपाच्या मागण्या आम्ही तहसीलदारांना सांगितल्या आहेत. आम्ही त्यांनी पत्र दिलेले आहेत. आमच्या महत्त्वाच्या मागण्या एकच आहे की सगेसोयरेचा जो ड्राफ्ट नोटीफिकेश होता तर त्याला अनेक आठ ते साडे आठ लाख हरकती महाराष्ट्रातल्या तमाम ओबीसींनी मंत्रालयामध्ये पाठवल्या याच्यावर सुनावणी झाली नाही.
याच्या फेवरमध्ये किती आहे त्याच्या विरोधात किती आहेत का म्हणण आहे आणि कसं सगेसोयरेंनी ओबीसींची आरक्षणाचा घात होईल अशा प्रकारच्या ह्या हरकतींचं आपण जे म्हणतो ते विवेचन किंवा त्याच्या सुनावण्या त्या हरकतींमध्ये सरकारने काय निर्णय घेतला की काही केलेलं नाही आणि मनोज जरांगे तिथे बसले आहेत तिथे आमच्या शेजारी. जोपर्यंत जरांगे तिथे बसले आहेत आणि सरकार त्याच्या बाबतीत काय निर्णय घेतय याच्यावर आमचं बारीक लक्ष आहे. जर सरकारद्वारे आम्हाला धोका निर्माण होत असेल किंवा या येणाऱ्या निवडणूकींच्या किंवा या जरांगेच्या धमक्यांना घाबरुन सरकार जर ओबीसीचं घात करणार असेल, कुठला शासन निर्णय काढणार असेल तर आम्ही तोपर्यंत जोपर्यंत आम्हाला शास्वती वाटत नाही आमचं आरक्षण आबाधित राहणार आहे, आमच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, तोपर्यंत आमचं हे उपोषण चालू राहणार आहे असं मंगेश ससाणे म्हणाले.