नार्वेकरांनी ठाकरेंना उत्तर द्यायला नको होते; असं का म्हणालं संजय शिरसाट?
छत्रपती संभाजीनगर : पुरावा की गाडावा, असे म्हणत उध्दव ठाकरे यांनी महापत्रकार परिषदेतून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला. यावर राहुल नार्वेकर यांनीही पत्रकार परिषद घेत दसऱ्या मेळाव्याचे रुप बोलावे की गल्लीबोळातील भाषणांचे रुप बोलावे, अशा शब्दात उध्दव ठाकरेंवर पलटवार केला. या पार्श्वभूमीवर संजय शिरसाट यांनी मोठे विधान केले आहे.
संजय शिरसाट म्हणाले की, महापत्रकार परिषदेची सुरुवात की तेथील कार्यकर्ते यांचा मेळावा होता. जागतिक रेकॉर्ड भासवण्याचा प्रयत्न केला. ज्यांची वकिली चालत नाही ते वकिलांच्या भाषेत बोलत होते आणि राज्यपाल यांना वाईट बोलत होते. त्यांनी संजय राऊत यांनी स्क्रिप्ट वाचली. त्यांचा उठाबा गटात प्रवेश होतो की काय? हे लोकाना पटलं नाही. हा फुसका बार, त्याचे पडसाद सामनामध्ये उमटले. स्वतःचे कपडे स्वतःच्या हाताने उतरवले, अशा शब्दात त्यांनी ठाकरे गटावर हल्लाबोल केला.
तर, राहुल नार्वेकरांच्या पत्रकार परिषदेबाबत बोलताना ते म्हणाले, राहुल नार्वेकर यांनी उत्तर द्यायला नको होते. त्यांनी पत्रकार परिषद घ्यायला नको होते, असे शिरसांटांनी म्हंटले आहे.
एकनाथ शिंदे पाया पडले, आम्ही पण पाया पडलो. परंतु, तुमच्याबद्दल घृणा निर्माण झाली, तुम्ही संत दाखवण्याचा प्रयत्न हा कमीपणाचा संस्कार व्यक्त केला. संस्कार म्हणजे लाचारी वाटत असेल तर दुर्दैव. तुमचेही मोदींच्या पाया पडल्याचे फोटो दाखवल्यास बघा. तणाव आल्यावर असे रिकामे उद्योग करतात. गाडलेले मुडदे काढून उपयोग नाही.आम्हीच जिंकणार,आम्ही कायदेशीर लढाई जिंकतो, असा विश्वास शिरसाटांनी व्यक्त केला आहे.
त्यांना आणखी माहित नाही, आमचा मेळावा झाला. आम्ही घटनादुरुस्तीसाठी कागदपत्रे दाखल केली आहेत. पक्षाचे मुख्य नेता हे पद एकनाथ शिंदे यांना बहाल केले. विधीमंडळ आतमध्ये आणि बाहेर पण तेच. तुम्ही तुमचा पक्ष सांभाळा, असा सल्ला संजय शिरसाटांनी उध्दव ठाकरेंना दिला आहे.