मराठी मुलीला घर नाकारलं, संजय शिरसाट म्हणाले..

मराठी मुलीला घर नाकारलं, संजय शिरसाट म्हणाले..

मुंबईत मराठी माणसाला जागा देण्यास नकार दिल्याचा आरोप महिलेनी व्हिडिओतून केला असून तृप्ती देवरुखकर एकबोटे या महिलेचा हा व्हिडीओ आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

मुंबईत मराठी माणसाला जागा देण्यास नकार दिल्याचा आरोप महिलेनी व्हिडिओतून केला असून तृप्ती देवरुखकर एकबोटे या महिलेचा हा व्हिडीओ आहे. महाराष्ट्रीयन माणसाला इमारतीमध्ये घर देत नाही, असे सांगून घर भाड्याने देण्यास नकार दिल्याचा आणि जाब विचारल्यावर मारहाण केल्याचा आरोप तृप्ती देवरुखकर एकबोटे यांनी केला.

यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर आता संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय शिरसाट म्हणाले की, मुंबई मराठी माणसाची आहे. घर नाकारण्यांवर कारवाई व्हायला हवी.

पंकजा मुंडे यांच्याबाबत असे झाले तेव्हा पंकजा मुंडे का बोलल्या नाहीत? त्याचवेळी त्या आक्रमक झाल्या असत्या तर परिस्थिती वेगळी असती. केम छो वरळी यासारखे पोस्टर लावले, लुंगी डान्स कुणी केला? मतांसाठी लाचारी पत्करली म्हणून ही वेळ आली. असे शिरसाट म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com