संजय राऊत स्वतःच्या बापाला सुद्धा घाबरत नव्हता म्हणून...; शिरसाटांचा चिमटा

संजय राऊत स्वतःच्या बापाला सुद्धा घाबरत नव्हता म्हणून...; शिरसाटांचा चिमटा

अजित पवारांवरुन संजय शिरसाटांची संजय राऊतांवर टीका
Published on

मुंबई : राष्ट्रवादी नेते अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चेला उधाण आले होते. परंतु, अजित पवारांनी या चर्चांना फेटाळून लावले असून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनाही फटकारले आहे. याला संजय राऊतांनी मी कुणाच्या बापाला घाबरत नाही, असे प्रत्युत्तर दिले होते. यावरुन शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.

संजय राऊत स्वतःच्या बापाला सुद्धा घाबरत नव्हता म्हणून...; शिरसाटांचा चिमटा
सदोष मनुष्यवधप्रकरणी विधीमंडळाचे दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवा; पटोलेंची मागणी

संजय राऊत यांनी स्टेटमेंट केलं आहे ते बरोबर आहे. संजय राऊत स्वतःच्या बापाला सुद्धा घाबरत नव्हता म्हणून विधान केलं. महाविकास आघाडीला डुबावण्याचं काम संजय राऊतांनी केलं आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना डुबावण्याचं काम केलं आहे, अशी टीका संजय शिरसांटांनी संजय राऊतांवर केली आहे.

तसेच, अजित दादांशी पंगा घेतला आहे. उद्धव ठाकरे सहन करतील दादा सहन करणार नाही आणि योग्य उत्तर अजित दादा देतील, असेही संजय शिरसाटांनी म्हंटले आहे.

दरम्यान, अजित पवारांच्या टीकेला संजय राऊतांनी उत्तर दिले आहे. राष्ट्रवादी फुटीच्या चर्चेला मी जबाबदार नाही. शरद पवारांची भूमिका आमच्यासाठी महत्त्वाची आहे. मी फक्त शरद पवारांचं ऐकतो. अजित पवारांवरून भाजप बॅकफूटवर पडली. मी मविआचा चौकीदार आहे. सेनाफुटीनंतर तुम्हीही आमच्यावर बोललात. राष्ट्रवादी फोडण्याचा भाजपचा डाव आम्ही उघडा केला. वकिलीचं खापर माझ्यावर का फोडता, असा सवाल राऊतांनी केला होता.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com