'एकनाथ शिंदेंनी निवडणूक लढवावी, हरवल नाही तर बापाचे नाव लावणार नाही'

'एकनाथ शिंदेंनी निवडणूक लढवावी, हरवल नाही तर बापाचे नाव लावणार नाही'

जळगाव Shivsena जिल्हा संपर्कप्रमुखांचे मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान
Published on

मंगेश जोशी | जळगाव : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व आमदार किशोर पाटील (Kishor Patil) यांनी राजीनामा देऊन पाचोऱ्यातून निवडणूक लढवून दाखवा. त्यांच्या विरोधात ठाकरेंचा शिवसैनिक निवडून न आणल्यास बापाचे नाव लावणार नाही, असे थेट आव्हान जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत (Sanjay Sawant) यांनी मुख्यमंत्र्यंना दिले आहे. पाचोरा येथील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.

'एकनाथ शिंदेंनी निवडणूक लढवावी, हरवल नाही तर बापाचे नाव लावणार नाही'
Aditya Thackeray : जे गेले त्यांच्या रक्तात शिवसेना नव्हतीच ते गद्दारच

महाराष्ट्रात जे नवे जन्माला आले. ते दाढी वाढवल्यामुळे महाराज किंवा आनंद दिघे होऊ शकत नाही. त्यासाठी धमक व सत्य बोलण्याची हिंमत लागते. शिवसेना संपली असती म्हणून हिंदुत्वासाठी बाहेर पडलो, असे लोकांना खोटे बोलून जे बाहेर पडले. त्यांना शिवसेनेची काळजी करण्याची गरज नाही. जोपर्यंत बाळासाहेबांचे नाव आहे. तोपर्यंत त्यांच्या दहा बापांमध्येही शिवसेना संपवण्याची हिंमत नाही, अशी प्रखर टीका संजय सावंत यांनी केली आहे.

'एकनाथ शिंदेंनी निवडणूक लढवावी, हरवल नाही तर बापाचे नाव लावणार नाही'
एकनाथ शिंदेंसोबत राहणे आमची मजबुरी; शिंदे समर्थक

दरम्यान, पाचोर्‍याचे बंडखोर आमदार किशोर पाटील किंवा एकनाथ शिंदे यांनी राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवून दाखवावी. त्यांच्या विरोधात ठाकरेंचा शिवसैनिक निवडून न आणल्यास बापाचे नाव लावणार नाही, असे थेट आव्हान संजय सावंत यांनी दिले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com