अजित पवार भाजपात जाणार? राऊत म्हणाले, शिवसेना तोडली तशी राष्ट्रवादीमध्ये फूट...

अजित पवार भाजपात जाणार? राऊत म्हणाले, शिवसेना तोडली तशी राष्ट्रवादीमध्ये फूट...

विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपात जाणार असल्याचा चर्चा मागील काही दिवसांपासून रंगल्या आहेत.
Published on

मुंबई : विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपात जाणार असल्याचा चर्चा मागील काही दिवसांपासून रंगल्या आहेत. यासाठी अजित पवार यांनी अमित शहा यांची भेट घेतल्याचेही बोलले जात आहे. यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना तोडली तसा राष्ट्रवादीमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न असल्याची टीका राऊतांनी दिली आहे.

अजित पवार भाजपात जाणार? राऊत म्हणाले, शिवसेना तोडली तशी राष्ट्रवादीमध्ये फूट...
वज्रमूठ सभा नव्हती तर मविआत सफेद झूठ बोलण्याची स्पर्धा होती; दरेकरांचे टीकास्त्र

राष्ट्रवादी काँग्रेस मविआमधून बाहेर पडणार नाही हे शरद पवारांनीच स्पष्ट केल आहे. ईडी, सीबीआय, पोलीस, तपास यंत्रणांचा दबाव टाकून ज्याप्रकारे शिवसेना फोडली. त्याचप्रकारे राष्ट्रवादी फोडण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. काही आमदारांबाबत काही प्रकरणं चालू आहेत. तर, मला अजिबात वाटत नाही की अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस सोडून वेगळ्या दिशेने जातील. एकंदरीत त्यांच्या भूमिका परखड आहेत. ते स्पष्ट बोलतात. काल रात्री ते स्वत: उद्धव ठाकरेंसमवेत नवी मुंबईतील रुग्णालयात रुग्णांची विचारपूस करत होते, असे संजय राऊत यांनी म्हंटले आहे. तसेच, राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार नसल्याचे पवारांनी सांगितले असल्याचेही राऊतांनी सांगितले.

दरम्यान, खारघर येथे झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात 11 श्री सदस्यांना उष्माघातामुळे मृत्यू झाला आहे. तर काही जणांवर उपचार सुरु आहेत. यावर संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्र भूषण पुरस्कारावेळी घडलेली घटना दुर्दैवी आहे. अप्पासाहेबांचे भक्त तळपत्या उन्हात बसले होते. मंचावर राजकीय कुरघोड्या सुरू होत्या. कार्यक्रमाची आखणी करताना नियोजन हवं होते. परंतु, त्यांनी भक्तांची व्यवस्था पाहण्याऐवजी राजकीय व्यवस्था पाहिली. कार्यक्रम किती काळ चालला पाहिजे याचंही नियोजन हवं होते. राजकारण्यांनी श्री सदस्यांचा अंत पाहिल्याची टीका राऊतांनी केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com