रामदेव बाबांच्या वक्तव्यावर अमृता वहिनी गप्पच कशा? राऊतांचा सवाल; तेथेच एक सणसणीत...

रामदेव बाबांच्या वक्तव्यावर अमृता वहिनी गप्पच कशा? राऊतांचा सवाल; तेथेच एक सणसणीत...

ठाण्यातील एका कार्यक्रमात रामदेव बाबांनी महिलांविषयी आक्षेपार्ह विधान केलं आहे. या विधानाचा सर्वच स्तरांतून निषेध करण्यात येत असून विरोधकांनी रामदेव बाबांवर टीकेची झोड उठवली आहे.
Published on

मुंबई : राज्यात वादग्रस्त विधानांवरून रान पेटलेले असतानाच आज ठाण्यातील एका कार्यक्रमात रामदेव बाबांनी महिलांविषयी आक्षेपार्ह विधान केलं आहे. या विधानाचा सर्वच स्तरांतून निषेध करण्यात येत असून विरोधकांनी रामदेव बाबांवर टीकेची झोड उठवली आहे. तर, संजय राऊत यांनीही जोरदार टीका केली आहे. लज्जास्पद विधान केल्यानंतरही अमृता वहिनी गप्प कशा बसल्या, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहेत.

रामदेव बाबांच्या वक्तव्यावर अमृता वहिनी गप्पच कशा? राऊतांचा सवाल; तेथेच एक सणसणीत...
...म्हणून आम्ही गुवाहाटीला जात आहोत; एकनाथ शिंदेंनी सांगितले कारण

संजय राऊत म्हणाले, अतिशय लज्जास्पद विधान केले असताना उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नी तेथे उपस्थित होत्या. अशाप्रकारचे लज्जास्पद विधान केल्यानंतर अमृता वहिनी गप्पच कशा बसल्या. असे विधान करणारा कोणीही कितीही मोठा असो त्यांच्या सणसणीत कानाखाली बसायला पाहिजे, असे त्यांनी म्हंटले आहे.

एका बाजूला तुम्ही महिलांच्या रक्षणाच्या सबलीकरणाच्या गोष्टी करता कायदे बनवता. आणि त्याचवेळेला असंख्य महिलांसमोर एक बाबा भगव्या वस्त्रात महिलांचा असा अपमान करतो. राज्यपालांच्या बाबतीत सरकार गप्प बसलयं., कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सोलापूर, सांगली खेचून घेण्याची भाषा केली तरी शिंदे सरकार तोंड शिवून बसलयं. आणि आता रामदेव बाबासारखे भाजपचे महाप्रचारकाने हे महिलांविषयी असे उद्गार काढले तरी सरकार गप्प बसलयं. सरकारची जीभ दिल्लीला गहाण ठेवलीये का, असा सवाल त्यांनी शिंदे फडणवीस सरकारला केला आहे.

रामदेव बाबांच्या वक्तव्यावर अमृता वहिनी गप्पच कशा? राऊतांचा सवाल; तेथेच एक सणसणीत...
राज्यपाल पुन्हा वादात! चप्पल घालूनच कोश्यारींनी केले 26/11तील शहीदांना अभिवादन

काय म्हणाले होते रामदेव बाबा?

ठाण्यातील कार्यक्रमात महिलांसाठी योग शिबिराचे आणि महासंमेलानाचे आयोजन केले होते. महिलांनी योगासाठी ड्रेस आणले होते व महासंमेलानासाठी महिलांनी साड्या आणल्या होत्या. मात्र, सकाळी योगा शिबिर झाल्यानंतर लगेच महिलांसाठी महासंमेलन सुरू करण्यात आले. त्यामुळे महिलांना साड्या नेसायला वेळच मिळाला नाही. यावर बाबा रामदेव यांनी वादग्रस्त विधान केले. साड्या नेसायला वेळ नाही मिळाला, तरी काही समस्या नाही, आता घरी जाऊन साड्या नेसा, महिला साड्या नेसून पण चांगल्या वाटतात, महिला सलवार सूटमध्ये सुद्धा चांगल्या वाटतात, आणि माझ्या नजरेने काही नाही घातलं तरी चांगल्या दिसतात, असे रामदेव बाबांनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com