धनुष्यबाण चिन्ह गोठवलं! संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले...

धनुष्यबाण चिन्ह गोठवलं! संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले...

शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगाने गोठवल्यामुळे उद्धव ठाकरे तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला चिन्ह वापरता येणार नाही.
Published on

मुंबई : शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगाने गोठवल्यामुळे उद्धव ठाकरे तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला चिन्ह वापरता येणार नाही. तर, नाववरही काही निर्बंध लावले आहे. यामुळे राज्यात सध्या नवे वादंग उभे राहीले आहे. यावर सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. परंतु, सर्वांनाच प्रतिक्षा होती ती शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या प्रतिक्रियेची. अखेर आज संजय राऊत यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. नावात काय आहे खरी शिवसेना कुणाची हे सर्वांना माहित आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.

धनुष्यबाण चिन्ह गोठवलं! संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले...
ठाकरे x शिंदे गटात थेट लढत; मुरजी पटेल शिंदे गटाचे उमेदवार?

पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांची कोठडीची मुदत संपल्याने त्यांना आज न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. यावेळी न्यायालयाच्या परिसरात संजय राऊतांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, चिन्ह गेल्याची ही काही पहिली वेळ नाही. कॉंग्रेसमध्ये इंदिरा गांधी यादेखील अशाच परिस्थितीतून पुढे गेल्या होत्या. तीन वेळा त्यांचेही चिन्ह बदलले होते. जनसंघालाही या परिस्थितीचा सामना करावा लागला. त्यामुळे हे काही नवीन नाही. बहुदा हे नवे चिन्हचं शिवसेनेसाठी क्रांती घडवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

नावात काय आहे, खरी शिवसेना कुणाची हे सर्वांना माहित आहे. आमच्यात शिवसेनेचे स्पिरीट आहे. अंधेरी निवडणुकीपूर्वी धनुष्यबाण व नाव हे शिंदे गटाला इतक्या सहजासहजी मिळणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात महाराष्ट्रात सध्या संतापाचे वातावरण आहे, असेही राऊतांनी म्हंटले आहे.

धनुष्यबाण चिन्ह गोठवलं! संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले...
ठरलं! शिंदे गटाने निवडणूक आयोगाला सुचवली 'ही' तीन चिन्हे

दरम्यान, निवडणुक आयोगाच्या सुनावणीनंतर ठाकरे गटाची महत्वपूर्ण बैठक पार पडली. यामध्ये ठाकरे गटाने नावासाठी 'शिवसेना बाळासाहेब ठाकरे' ही पहिली पसंती, तर 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' ही दुसरी पसंती असल्याचे समजत आहे. तर, चिन्हासाठी प्रथम त्रिशूल, उगवता सूर्य आणि मशाल असे तीन चिन्ह सुचविले आहेत. परंतु, ही तिन्हीही चिन्हे निवडणूक आयोगाच्या यादीत नाहीत. यामुळे शिवसेनेला कोणते चिन्ह मिळाणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com