Sanjay Raut : ...तर त्यांनी संभाजीराजेंना उमेदवारी का दिली नाही ?
मुंबई : महाविकास आघाडीने सरकारने आपला निम्मा कालावधी पूर्ण केला आहे. अशातच राष्ट्रवादी नेत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि मनसे नेते गजानन काळे (Gajanan Kale) यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राज्यात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा रंगल्या आहेत. परंतु, सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आहेत. आणि हेच २५ वर्ष मुख्यमंत्री राहतील, असा विश्वास शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले आहे.
सुप्रिया सुळे या तुळजापुरात देवीचे दर्शन घेत असताना पुजाऱ्यांनी पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच होऊ दे, पूर्ण राष्ट्रवादी घेऊन नवस फेडण्यासाठी तुळजापूरमध्ये येऊ, असे साकडे सुळे यांच्यादेखत देवी चरणी घातले. यावरुन आता राज्यामध्ये मुख्यमंत्री बदलाची चर्चा रंगली आहे. यावर संजय राऊत म्हणाले की, सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत. आणि हेच २५ वर्ष मुख्यमंत्री राहतील, असेच सुप्रियाताईंचं म्हणणं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात असे संभ्रम काही लोकं निर्माण करत असतात. राज्यात मविआचं सरकार असून याचे नेतृत्व मुख्यमंत्री करत आहेत. शरद पवार, सुप्रिया सुळे, सोनिया गांधी, राहुल गांधी, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर खूश आहेत. त्यामुळे हा प्रश्न ज्यांनी निर्माण केला. त्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे, असे त्यांनी म्हंटले आहे.
राज्यसभा निवडणुकीवर संजय राऊत म्हणाले, सातवी जागा ज्याने भरली आहे त्यांना घोडेबाजार करायचा आहे, असं दिसते. कारण, त्यांच्याकडे तेवढी मतं नाहीत, मतं जर असती तर त्यांनी नक्की संभाजीराजेंना उमेदवार केलं असतं, असा दावाही त्यांनी केला आहे. सहाव्या जागेसाठी संभाजीं राजेंना उभं करण्याचा प्रयत्न केला. मात्र, नंतर वाऱ्यावर सोडलं, असा आरोपही राऊतांनी केला आहे.
मला आश्चर्य वाटतं दोन्ही उमेदवार हे बाहेरचे आहेत. भाजपचे नसून निष्ठावानांना डावलण्यात आलं. संघासोबत जे काम करत आहे. त्यांना बाजूला सारलं गेलं आहे, असेही संजय राऊतांनी म्हंटले आहे.