औरंगजेबजी सन्माननीय, असे बावनकुळेंना पटले;  राऊतांचे टीकास्त्र

औरंगजेबजी सन्माननीय, असे बावनकुळेंना पटले; राऊतांचे टीकास्त्र

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामना संपादकीयमधून बावनकुळे व भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
Published on

मुंबई : ‘संभाजीराजे हे स्वराज्य रक्षकच, धर्मवीर नाहीत’ या पवारांच्या विधानावर आता भाजपने वाद केला. पण, त्या औरंगजेबाचा अत्यंत आदरपूर्वक ‘मा. औरंगजेबजी’ असा उल्लेख भाजपचे प्रदेशाध्याक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामना संपादकीयमधून बावनकुळे व भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

औरंगजेबजी सन्माननीय, असे बावनकुळेंना पटले;  राऊतांचे टीकास्त्र
राज्यपाल पुन्हा वादात, छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख? मिटकरींनी दाखवला Video

संजय राऊत म्हणाले की, राज्यपालांनी शिवरायांचा अपमान केला. संभाजीराजांचा अपमान अजित पवारांनी केला असा भाजपचा दावा. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी इतिहासाला नवे वळण देण्याचे काम याच दरम्यान केले. ‘‘औरंगजेब क्रूर नव्हता,’’ अशी नवीच माहिती आव्हाडांनी समोर आणली. चंद्रशेखर बावनकुळे यांनी आव्हाड यांना धारेवर धरताना औरंगजेबाचा उल्लेख ‘औरंगजेबजी’असा केला. पण मला तेच एकमेव कारण दिसत नाही.

औरंगजेबजी सन्माननीय, असे बावनकुळेंना पटले;  राऊतांचे टीकास्त्र
“दीड फुटाच्या आमदाराची जीभ…” नितेश राणेंवर विद्या चव्हाणांची जोरदार टीका

औरंगजेबास ‘माननीय’ किंवा ‘औरंगजेबजी’ ठरवण्यामागे भाजप नेत्यांची मानसिकता अशी की, औरंगजेबजी यांचा जन्म गुजरातमधील दाहोद येथे झाला. जन्माच्या वेळी औरंगजेबाचे ‘पिताश्री’ गुजरातचे सुभेदार होते. औरंगजेबाच्या या गुजरात कनेक्शनमुळेच बावनकुळे यांनी त्याचा उल्लेख ‘औरंगजेबजी’ असा केला असावा! मागे एकदा काँग्रेसच्या नेत्याने अफझल गुरूचा उल्लेख ‘अफझल गुरूजी’ असा करताच याच भाजपने राष्ट्रवादाच्या नावाखाली धुमाकूळ घातला होता. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान सहन करणारेच ‘औरंगजेबजी’ यांचा सन्मान करू शकतात! महाराष्ट्रात तेच घडले, असेही संजय राऊत यांनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com