शिवसेनेच्या वादावर निवडणुक आयोगात सुनावणी; संजय राऊत म्हणाले...
मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगासमोर आज महत्वाची सुनावणी होणार आहे. या सुनावणीत शिवसेना तसेच धनुष्यबाण चिन्ह कोणाचं याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे आणि शिंदे गट प्रमुख एकनाथ शिंदे यांच्यासाठी ही सुनावणी महत्वाची ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.
शिवसेना कोणाच्या तांत्रिक मुद्दा निवडणूक आयोगाकडे जाऊ शकतो. निवडणूक आयोग हे आता जे काही निर्णय मागच्या काळात दिले त्यावरून समजते काय होतंय? शिवसेना कोणाची हा प्रश्न आता सध्या महाराष्ट्रात तरी प्रश्न उपस्थित होत नाही. खरी शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांची आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहेत, असे संजय राऊत यांनी म्हंटले आहे.
असे करार फक्त झाले असेल ते तीन दिवसात झाले. 1 लाख 36 हजार कोटीचे गुंतवणूक महाराष्ट्रात येणार असेल तर त्याचे स्वागतच केले पाहिजे. पण, खरोखर हे उद्योग येणार असतील तर हे खरंच झालं असेल तर ठीक आहे. अडीच लाख कोटींची गुंतवणूक कधी महाराष्ट्रात येणार होती ती डोळ्यासमोर निघून गेली. त्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री किंवा उद्योग मंत्री कोणीही प्रयत्न केले नाही. दावोसला जागतिक जत्रा भरते. गुंतवणूकदारांची त्या जत्रेतून सव्वा लाख कोटी आणणार आहेत. ते आल्यानंतर स्वागत करू त्यातून लोकांना उद्योग मिळेल त्यावरती नंतर आम्ही बोलू, असा टोला त्यांनी लगावला आहे.
दरम्यान, राहुल गांधींची भारत जोडो यात्रा 19 फेब्रुवारी रोजी जम्मू-काश्मीरमध्ये दाखल होणार आहे. यामध्ये संजय राऊत सहभागी होणार आहेत. याबाबत ते म्हणाले जम्मू-काश्मीरला मी जाणार आहे तेथील करणारी पंडितांना भेटणार आहे. त्यानंतर राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रा मध्ये सहभागी होणार आहे, असे त्यांनी सांगितले आहे.