Sanjay Raut : ये दिन भी निकल जायंगे

Sanjay Raut : ये दिन भी निकल जायंगे

ठाकरे सरकारची उद्या बहुमताची परीक्षा होणार आहे. यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्विटवरुन प्रतिक्रिया दिली आहे.
Published on

मुंबई : शिवसेनेच्या याचिकेवर आज 9 वाजता सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आहे. ठाकरे सरकारची उद्या बहुमताची परीक्षा होणार आहे. यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्विटवरुन प्रतिक्रिया दिली आहे. ये दिन भी निकल जायंगे, असे त्यांनी म्हंटले आहे.

राजकीय नाट्याचा आता शेवटचा अंक सुरु झाला असून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना बहुमत चाचणी सिद्ध करण्यासाठी पत्र पाठवले आहे. राज्यपालांच्या या आदेशाविरोधात शिवसेना सुप्रीम कोर्टात गेली आहे. परंतु, सुप्रीम कोर्टानेही ठाकरे सरकारला दिलासा दिला नसून बहुमताची परीक्षेस स्थगिती देण्यास नकार दिला आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी न्याय देवता का सन्मान होगा फायर टेस्ट, अग्नीपरिक्षा की घडी हैं. ये दीन भी निकल जायंगे. जय महाराष्ट्र, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय ठाकरे सरकारच्या विरोधात गेला आहे. त्यानंतर पाच मिनिटांत मुख्यमंत्र्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधला. 15 मिनिटांचे भावनीक संवाद साधत त्यांनी राजीनामा दिला. मुख्यमंत्रीपदासोबत विधान परिषद सदस्याचा राजीनामा देतांना देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. कारण मी पुन्हा येईन, असे बोललो नव्हतोच असे सांगत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची मी पुन्हा येईनची आठवण करुन दिली

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com