Sanjay Raut : "...तर अख्खा महाराष्ट्र आमच्या पकडीत येईल"
महापालिकेच्या आगामी निवडणुका (Municipal Elections) आल्या असून सेनेत दुफळी निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde ) व भाजपा यांचे सरकार राज्यात आले आहे. याचपार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत (Sanjay Raut) नाशिक दौऱ्यावर असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबवली आणि पुणे येथील नगरसेवक हे शिंदे गटात सहभागी होत आहे. मात्र, हे नगरसेवक नाहीतर माजी नगरसेवक असा उल्लेख संजय राऊत यांनी केला आहे. या महापालिकांवर आता प्रशासकाची नेमणूक झाली आहे. त्यामुळे जे गेले ते नगरसेवक नव्हते. शिवाय अशा अफवा पसरु नका असा सल्ला देऊन आता आमच्यासाठी संपूर्ण आभाळ खुलं आहे. त्यामुळे आम्ही जी गरुड झेप वाघाची झेप घेऊ त्यातून अख्खा महाराष्ट्र आमच्या पकडीत येईल असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नाशिक दौऱ्यावर असताना केले.
महापालिकेच्या आगामी निवडणुकावर बोलताना, तीनही महापालिकेची मुदत संपल्यामुळे तिथ प्रशासक आहेत. त्यामुळे इकडून २२ लोक गेले तिकडून वीस लोक गेले. असे आकडे असू शकतात पण नगरसेवक गेले अस म्हणणे चुकीचे आहे. असे म्हणत, मुंबई, ठाणे, नवी मुंबईत शिवसेनेचेच नगरसेवक निवडून येतील हे कदाचित माजी नगरसेवक असतील असे राऊत यांनी म्हटले आहे.
लोक शिवसेनेच्या मागे उभे आहेत. ते एका चिडीतून उभे आहेत. अरे महाराष्ट्रात कसं घडू शकत. ज्या मातोश्रीने भरभरुन दिल त्यांच्या बाबतीत जे घडलं ते जनतेला आजिबात आवडलेलं नाही. असे म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधला.
महाराष्ट्रात जे घडल त्याला भाजप जबाबदार आहे. सत्तानाट्य हे दिल्लीच कारस्थान आहे. महाराष्ट्राची बदननामी करण तुकडे करण. मुंबईला आमच्या पासून तोडण. आणि त्यासाठी शिवसेना कमजोर करण. हे सर्व भाजपच कारस्थान आहे. अशा शब्दात राऊतांनी भाजपवर निशाणा साधला.
त्यानंतर त्यांनी आज केलेल्या जब ''खोने"के लिए कुछ भी ना बचा हो तो "पाने" के लिए बहुत कुछ होता हैं!. जय महाराष्ट्र !.' या ट्विटसंदर्भात विचारले असता. हो हे खरचं आहे. आता आमच्यासाठी संपूर्ण आभाळ खुलं आहे. आता आम्ही जी गरुड झेप वाघाची झेप घेऊ त्यातून अख्खा महाराष्ट्र आमच्या पकडीत येईल. असे सध्या राज्यात वातावरण निर्णाण झालं आहे. असे आव्हानात्मक विधान राऊत यांनी यावेळी केले.
सेनेला फुटीचं ग्रहण
शिवसेना पक्षातील बंडखोरी रोखण्यासाठी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे रोज नवे उपक्रम घेऊन पदाधिकारी, नगरसेवक आणि आमदारांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करीत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून आमदारांचे बंड हे काही प्रमाणात का थंड झाले असले तरी हे बंडाचे लोण नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांपर्यंत येऊन ठेपले आहे. नवी मुंबई, पुणे पाठोपाठ आता कल्याण-डोंबवली महापालिकेतील तब्बल 55 पेक्षा जास्तीच्या नगरसेवकांनी बंड केले आहे. हे नगरसेवक आता शिंदे गटात सहभागी झाले आहेत. त्यामुळे केवळ आमदारच नाहीतर आता नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना रोखण्याचे आव्हान ठाकरेंच्या समोर असणार आहे.