बंडखोर कार्यकारणी कशी बरखास्त करणार? संजय राऊतांचा सवाल
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेला लागलेली गळती काही कमी नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संपूर्ण पक्षच आपल्या ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरु आहेत. 14 खासदारांनी शिंदे गटाला पाठिंबा दिल्याची माहिती पुढे आली आहे. तसेच एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त करून नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली आहे. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी खुलाशा केला आहे.
संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलतांना सर्व दावे खोडून काढले. राऊत म्हणाले की, शिवसेनेच्या फुटीर गटाला मान्यता नाही. जो कोणी फुटीर गटनेत्यासोबत जाणार त्यांच्यांवर कारवाई होणार आहे. शिंदे सरकार हे काही चालणार नाही. त्यांचे दुकान लवकरच बंद होईल. आम्ही अजूनही कायदेशीर लढाईच लढतो. एकनाथ शिंदे गटाच्या बैठकीला 14 खासदार उपस्थित होते, हा दावा खोटा असल्याचा आरोप त्यांनी केला. मुळ शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे. शिवसेना मोठा इतिहास आहे. आता सर्वाेच्च न्यायालयात आम्हाला न्याय मिळेल, ही अपेक्षा आहे.
पुण्यातून मोठ्या हालचाली
दिल्लीत शिवसेनेच्या राजकीय हालचाली वाढलेल्या असताना पुणे जिल्ह्यातील शिवसेनेचे मोठे नेते आणि शिरुर लोकसभा माजी खासदार शिवाजी आढळराव यांनी कार्यकर्त्याशी चर्चा करण्यासाठी त्यांच्या राहत्या घरी तातडीची बैठक आयोजित केली आहे.ही बैठक सकाळी 10 वाजता होणार आहे.त्यामुळे उद्या आढळराव पाटील शिंदे गटाच्या नवीन कार्यकारिणीची उपनेते पदी समावेश आहे यासंदर्भात पुढची रणनीती ठरवण्यासाठी या बैठकीचे आयोजन केल्याचे समजते आहे.