Sanjay Raut On Sharad Pawar: शरद पवारांच्या 'त्या' वक्तव्यावर संजय राऊत यांचं प्रत्युत्तर

Sanjay Raut On Sharad Pawar: शरद पवारांच्या 'त्या' वक्तव्यावर संजय राऊत यांचं प्रत्युत्तर

शरद पवार यांनी संजय राउतांवर यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला आहे.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

शरद पवार यांनी संजय राउतांवर यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला आहे. शरद पवार म्हणाले की, शिवसेनेच नेते येणार आणि उमेदवार जाहीर करणार असा अधिकार कोणालाही नाही. तीन पक्ष मिळवून उमेदवार ठरवणार आहे. शिवसेनेकडून एकट्याने उमेदवारी घोषित करणे बरोबर नाही, असे पवार म्हणाले. संजय राऊत यांनी शिवसेनेची उमेदवारी जाहीर केल्यामुळे राष्ट्रवादीकडून इच्छुक उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांनी शरद पवारांची भेट घेतली.

शरद पवार यांच्याकडे चुकीची माहिती आहे. प्रत्येक घटक पक्ष आपापल्या पक्षातील उमेदवारांना काम करण्यासाठी एक संदेश देत असतो. 288 मतदारसंघात आमची तयारी आहे. काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल हे आपापल्या प्रमुख कार्यकर्त्यांना एक संदेश असतो की आपण तयारी करा. श्रीगोंदाच्या बाबतीत काय घडतंय माहित नाही पण श्रीगोंदा हा काही हॉट विषय नाही. श्रीगोंद्यात महाविकास आघाडीचा उमेदवार जिंकेल हे मला माहिती आहे. कोण कुठेही उमेदवारी जाहीर केलेली नाही. सर्व मतदारसंघांमध्ये आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना संभाव्य उमेदवारांना तयारीला लागा हा संदेश दिला असेल तर त्यात काय चुकतंय असं वाटत नाही.कामाला लागा पुढे व्हा तयारीला लागा असे संदेश शरद पवार जयंत पाटील नाना पटोले यांनीही दिलेले असतात त्याच्यात एवढे आक्षेप घ्यायचे कारण नाही असे संजय राऊत म्हणाले.

संजय राऊत सिनेट निवडणूकावर म्हणाले की, या राज्यात निवडणुका घ्यायचाच नाहीत हे धोरण मिंधे सरकारने अवलंबलेल आहे. कारण निवडणुका घेतल्या की लोक जोडे मारतील. जिथे मतदार विकत घेतला जाऊ शकत नाही अशा ठिकाणी मिंधे असतील फडणवीस असतील किंवा अजित दादा असतील हे निवडणुका घेण्यास घाबरतात. लोकशाहीला आणि लोकशक्तीला घाबरणारे हे डरपोक सरकार आहे. निवडणुकीला 24 तास असताना सिनेटची निवडणूक आपण शंभर टक्के हरणार असं समजल्यावर निवडणूक रद्द केली. मुंबईच्या उच्च न्यायालयाने त्यांना चपराक लावली आणि निवडणुकीचा मार्ग मोकळा केला. मी असा ऐकतोय मुंबई विद्यापीठातले जे काही प्रशासन आहे ते कोर्टात जाऊन आजही या निवडणुकीला स्थगित करण्याचा प्रयत्न करत आहे. याचा अर्थ विद्यापीठावर राजकीय दबाव आहे. हा दबाव जसा सरकारचा आहे तसा ज्या विचारांचे कुलगुरू किंवा इतर अधिकारी त्या विद्यापीठावर बसलेले आहेत त्यांच्या मदरबोडीचा हा दबाव आहे. मुंबई हायकोर्टाच्या निकालानंतर निवडणुका पार पडतील आणि सर्वच्या सर्व जागा शिवसेनेचे म्हणजेच युवा सेनेचे आमचे सर्व लोक जिंकतील याच्याबाबत आमच्या मनात शंका नाही. अशाच पद्धतीने यांनी महानगरपालिकेच्या निवडणुका घेतलेल्या नाहीत 14 महानगरपालिकेच्या निवडणुका घेतलेल्या नाहीत असे संजय राऊत म्हणाले.

राष्ट्रपतींनी शेवटी पत्र लिहिलं आहे आयुक्तांना राष्ट्रपती पुण्यात आल्या होत्या आणि पुण्यातल्या रस्त्यांवर खड्डे आहेत त्याचा फटका राष्ट्रपतींना बसला आणि राष्ट्रपती इतक्या बेजार झाल्या. त्या खड्ड्यांमुळे त्यांना शेवटी दिल्लीला गेल्यावर राष्ट्रपती भवनातून पुण्याच्या आयुक्तांना पत्र लिहून खडसे व्हावे लागलं की रस्ते दुरुस्त करा हे आपले राष्ट्रपती सांगतात. मला भीती वाटत होती की राष्ट्रपतींचा ताफा कुठेही अडकून आहे खड्ड्यांमध्ये कारण ज्या पद्धतीने रस्त्यावर खड्ड्यामध्ये ट्रकच्या ट्रक आत मध्ये गेलेत अशाप्रकारे राष्ट्रपतींचा ताफा संकटात अडकून आहे ही भीती आम्हाला वाटत होती. 14 महानगरपालिकेच्या निवडणुकांबाबत देखील कोर्टाने अशा प्रकारचा निर्णय घ्यावा असे संजय राऊत म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com