Sanjay Raut On PM Modi: "खोटं बोलण्याची स्पर्धा जगात लावली तर ऑलिम्पिकला नरेंद्र मोदीला गोल्डमॅडल मिळाले पाहिजे"
ज्या क्षणी निलेश लंके यांचं नाव जाहीर झालं लोकसभेचे उमेदवार म्हणून तेव्हा आम्ही निर्णय देऊन टाकला राष्ट्रवादी काँग्रेसचा एक खासदार दिल्लीला गेला. महाराष्ट्रामध्ये ज्या मोजक्या जागा आहेत तेथे प्रचार करायची गरजच नाही, आपल्याला महाविकास आघाडीला फार त्यातील ही निलेश लंकेची जागा आहे. निलेश लंके यांना आम्ही आज ओळखत नाही राष्ट्रवादी काँग्रेस आज ओळखते. पवार साहेब आणि थोरात साहेब हे आमचे तालुका प्रमुख होते. हे आमचे अत्यंत कडवट शिवसैनिक आज ते महाविकास आघाडीमध्ये आहेत आणि आमची सगळी शिवसेना जी आहे ती त्याच्या मागे ठामपणे उभी आहे.
मगाशी रोहित पवार आपण इंग्रजीमध्ये भाषण केलं थोडसं. खासदाराला इंग्रजी आलंच पाहिजे असं काही नाही खूप लोकांना इंग्रजी येत नाही पण संसदेत किती जण तोंड उघडतात जनतेच्या प्रश्नावर, पाण्याच्या प्रश्नावर, कांद्याच्या प्रश्नावर, शेतीच्या प्रश्नावर, दूधाच्या प्रश्नावर हे जे तुमचे खासदार आहेत 5 वर्षामध्ये त्यांनी या भागातला एकतरी प्रश्न संसदेमध्ये विचारला आहे का? याचा रेकॉर्ड संसदेत मिळतो ते आपण पाहायला मिळतो.
गेल्या दहा वर्षामध्ये या देशामध्ये नरेंद्र मोदींचं राज्य आहे. मला आजच समजलं नरेंद्र मोदी काल या भागामध्ये येऊन गेले. पंतप्रधान पूर्वी महाराष्टात आले की आम्हाला आठ दिवस आधी कळायचं की पंतप्रधान येतायेत. लोकं आता त्यांना बेदखल करण्याच्या विचारामध्ये आहे. गेल्या 20 दिवसांमध्ये 27 सभा महाराष्टामध्ये प्रधानमंत्र्यांनी घेतला. मुंबईमध्ये 10 सभा घेणार आहेत आणि ज्या उरलेल्या निवडणुका या महाराष्ट्रामध्ये अजून त्यांचा 18 ते 20 सभा होणार आहे. प्रधानमंत्री प्रचारमंत्री झालेले आहेत. दहा वर्षात उत्तम काम केलं असतं तर अशी वेळ आली नसती. 33 कोटी देवांनीच ठरवला आहे की नरेंद्र मोदींचा पराभव करायचं आहे. जर खोटं बोलण्याची स्पर्धा जगात लावली तर ऑलम्पिकला नरेंद्र मोदीला गोल्डमॅडल मिळाले पाहिजे. सबसे तेज झूठ बोलने वाला प्रधानमंत्री असे म्हणत संजय राऊत यांनी नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे.
या देशामध्ये हुकूमशाही पद्धतीने राज्य करण्याची त्यांची इच्छा आहे आणि हुकूमशाही सुरु झाली आहे. लोकसशाहीच्या नावाखाली हुकूमशाही आणायची आहे. विरोधकांना तुरुगांत डांबून ठेवायचं आहे. खोटे गुन्हे दाखल करायचे आहेत. जर आम्ही सगळे मिळून या मोदीच्या हुकूमशाहीला विरोध करु. एवढंट नव्हे तर विरोधी पक्षात बसलेल्या मोदीला आम्ही सांगू कारण मोदी आता येत नाही मोदी हारलेला आहे. या देशामध्ये 2024 नंतर इंडिया आघाडीचंच सरकार येतंय. नरेंद्र मोदी या विरोधी पक्षात बसलेला आम्हाला दिसेल आणि मोठया बहुमताने आम्ही जिंकून येत आहोत, सरकार इंडिया आघाडीचं येतं आहे कोणाला शंका असल्याचं कारण नाही असे संजय राऊत म्हणाले.