"मुंबईमध्ये मराठी आणि गुजराती हा वाद मोदी आणि शाहा यांनी लावला" - संजय राऊत

"मुंबईमध्ये मराठी आणि गुजराती हा वाद मोदी आणि शाहा यांनी लावला" - संजय राऊत

आमची गुजराती समाजाची, गुजराती भाषेची भांडण नाही आहे. मुंबईमध्ये मराठी आणि गुजराती हा वाद गुजरातच्या राज्यकर्त्यांनी आणि मोदी शाहा यांनी लावला आहे, आम्ही नाही लावला.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

याच्यावरती क्रिकेट असोसिएशनने प्रश्नचिन्ह उपस्थित केला पाहिजे. तुमच्या क्रिकेट संघटनेच्या नावापुढे मुंबई आहे आणि मुंबई महाराष्ट्राची आहे तर त्यांना हे वेदना झाले पाहिजे. त्या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कार्यकारणीवरती अनेक मराठी लोक आहेत, त्यात शिवसेनेची ही लोकं आहेत त्यांनी आक्षेप घेतला पाहिजे होता की मुंबईमध्ये क्रिकेटपटूंचं आगमन होत आहे रोहित शर्मा हा मुंबईचा खेळाडू आहे बरेचसे खेळाडू मुंबईतले आहेत मुंबई इंडियन्सचे आहेत, पण त्यांच्या स्वागतासाठी तुम्हाला गुजरात वरून बस आणावी लागते हे तुम्ही काय दाखवत आहात?

संजय राऊत क्रिकेटपटूंच्या बसबद्दल बोलत असताना म्हणाले की, यापूर्वी सुद्धा अशा प्रकारचे संघ किंवा अशा प्रकारचे उत्सव झाले तेव्हा मुंबईने त्यांचे जोरदार स्वागत केले आहे. मुंबईच्या ताब्यात बेस्टच्या ताब्यात अशा प्रकारचे बसेस आहेत ते नसती तर एका रात्रीमध्ये बनवून घेतली असती एवढी मुंबईची क्षमता आहे. पण खास गुजरात वरून बस पाठवण्यात आली, म्हणजे गुजरात आहे म्हणून देश आहे असं तुम्ही दाखवत आहात का ही सबकुछ गुजरात. बनारसमध्ये मोदी यांना जो पराभवाचा सामना म्हणत नाही पण तो निसटता विजय त्यांना मिळाला आणि पराभव होता होता वाचला तो यामुळे वाराणसीमधील सर्व ठेकेदारी गुजरातच्या लोकांच्या हातामध्ये आहे. अगदी प्लंबरपासून ते दुकानदारी, हॉटेल या चिडीतून वाराणसीच्या लोकांनी मोदींचा पराभव करण्याच्या प्रयत्न केला मोदी थोडक्यात बचावले आणि मुंबईत सुद्धा भारतीय जनता पक्षाचा दारुण पराभव याचमुळे झाला आहे. मुंबई या देशाची आर्थिक राजधानी आहे. मुंबई सर्व काही आहे. मुंबईतलाच पैसा गुजरातला जात आहे. इथूनच लूट होत आहे आणि तिकडे जात आहे. त्याच्यामुळे एक बस आली त्यामुळे काही फरक दिसत नाही पण एक वृत्ती दिसत आहे असे वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले आहे.

आदित्य ठाकरे याच्यावर उत्तर द्यायला समर्थ आहेत. आमची गुजराती समाजाची, गुजराती भाषेची भांडण नाही आहे. मुंबईमध्ये मराठी आणि गुजराती हा वाद गुजरातच्या राज्यकर्त्यांनी आणि मोदी शाहा यांनी लावला आहे, आम्ही नाही लावला, आणि तो वाद नाही आहे मराठी आणि गुजराती हा वाद मुंबईमध्ये असूच शकत नाही. हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी वारंवार सांगितला आहे, तुमची लक्ष्मी आमची सरस्वती यांचे युती झाली तर आपण देशावर राज्य करू. केम छो वगैरे वगैरे आहे ही फालतू धंदे बंद करा चाटुगिरी जी आहे भारतीय जनता पक्षाची जी आपण दाखवली आहे करून पण ही वृत्ती आहे मुंबईमध्ये सर्व असताना तुम्हाला गुजरात मधून या गोष्टी का आणाव्या लागतात. हा मुंबईला कमी दाखवण्याचा प्रयत्न आहे असे संजय राऊत म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com