Jalna : निवडणुकीआधी राज्यात दंगल घडवायची आहे; संजय राऊत यांचा गंभीर आरोप
जालना जिल्ह्यातील अंतरवाली जिल्ह्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तरुण आंदोलन करत होते. या मराठा आक्रोश मोर्चाचा उपोषणाचा चौथा दिवस आहे. पोलिसांनी तीव्र लाठीचार्ज केला. यामुळं आंदोलकांनी आक्रमक होऊन पोलिसांवर दगडफेक सुरु केला. यामध्ये काही आंदोलक जखमी झाले आहेत. दरम्यान, या घटनेचे पडसाद राज्यभर उमटताना दिसत आहेत.
याच पार्श्वभूमीवर संजय राऊत प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले की, पहिल्यांदाच मोर्चे निघाले नाहीत. मराठा समाजाने शिस्तबद्ध मोर्चे काढले आहेत. त्यांनी कधीच कायदा सुव्यवस्थेचं उल्लंघन केलं नाही. अशावेळी जाणीवपूर्वक लाठी हल्ला करून तणाव निर्माण केला गेला. शिंदे- फडणवीस सरकारचं फ्रस्ट्रेशन यातून बाहेर आलं. इंडिया बैठकीवरून लक्ष दुर्लक्षित करण्यासाठी हा सुनियोजित केलेला हल्ला आहे
तसेच मुंबईत इंडियाची बैठक सुरू होती. देशातील जनता या इंडियाच्या बैठकीकडे लक्ष देऊन होती. इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांची भाषण सुरू होती. त्यावरून लक्ष हटवण्यासाठी जालन्यात लाठीमार करून गोंधळ निर्माण केला. हे सरकारचं अपयश आहे. सरकारला हेच हवं आहे. निवडणुकीआधी राज्यात जातपात, धर्मावर दंगल घडवायची आहे. त्याची पहिली ठिणगी जालन्यातून पडली आहे. असे राऊत म्हणाले.