Sanjay Raut On Eknath Shinde: पराभवाची भीती असल्यानेच सत्ताधारी मनपा निवडणुका घेत नाही - संजय राऊत

Sanjay Raut On Eknath Shinde: पराभवाची भीती असल्यानेच सत्ताधारी मनपा निवडणुका घेत नाही - संजय राऊत

राज्यातील चौदा महानगरपालिकेच्या मुदत संपल्या आहे. मुंबई ही राज्याची आर्थिक राजधानी आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

राज्यातील चौदा महानगरपालिकेच्या मुदत संपल्या आहे. मुंबई ही राज्याची आर्थिक राजधानी आहे. गेल्या अडीच वर्षापासून मुंबईला महापौर नाही, लोकनियुक्त शासन नाही मुंबईची अवस्था अत्यंत खराब आहे. सत्ताधाऱ्यांना पराभवाची भीती असल्यानेच महानगरपालिकेच्या निवडणुका असं म्हणत राऊतांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे.

ईव्हीएममध्ये घोटाळा करता येतो असं अनेक तज्ज्ञांनी स्पष्ट केलं आहे. नुकत्याच झालेल्या तीन राज्यातील निवडणुकांचा निकाल लावला गेला असून ज्या राज्यात भाजपा पक्ष काठावर आहे. त्या ठिकाणी ईव्हीएमची सेटिंग करून मतं भाजपाला कसे जातील याचं नियोजन केले गेले, असा संशय संजय राऊतांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे ईव्हीएमवर बंदी आणण्यासंदर्भात सर्व विरोधकांनी एकत्र येत एक दिवसीय भारत बंद करणार आहे. याबाबतचा ठराव इंडिया आघाडीकडून मंजूर झाला असून लवकरच आंदोलन केले जाईल, असे त्यांनी सांगितले आहे.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी दिल्लीवरून निधी आणल्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना राऊत म्हणाले की, मुख्यमंत्र्यांना आमदारांचे पन्नास खोके व खासदारांचे शंभर खोके असा निधी मुख्यमंत्र्यांना निश्चित दिल्लीवरून मिळाला. मात्र मुंबई महानगरपालिकेतील 90 हजार कोटींची तिजोरी कोणी लुटली? महाराष्ट्राची लूट चालू आहे, महाराष्ट्रातला प्रत्येक उद्योग गुजरातला जातो आहे. मुख्यमंत्री कसला निधी दिल्लीवरून आणतात? हा विकास आहे का, अशी जहरी टीका राऊत यांनी मुख्यमंत्र्यांसह भाजपवर केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com