Sanjay Raut : 'नामांतराचा निर्णय रद्द करणारा शिंदे सरकार हिंदुत्वविरोधी'
औरंगाबादचे संभाजीनगर (Sambhajinagar) आणि उस्मानाबादचे (Osmanabad) धाराशिव ( Dharashiv ) असे नामकरण करण्याच्या महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी स्थगिती दिली. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील घेण्यात आलेल्या सर्व निर्णयाला आता स्थगिती मिळत आहे. याचपार्श्वभूमीवर नामांतराचा निर्ण रद्द करणारा शिंदे सरकार हिंदुत्वविरोधी असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर टोला लगावला आहे.
औरंगाबादचे संभाजीनगर (Aurangabad as Sambhajinagar) उस्मानाबादचे धाराशिव (Osmanabad as Dharashiv) आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे दि बा पाटील (Navi Mumbai International Airport name after D B Patil) असं नामांतर करण्याच्या निर्णायाला स्थगिती देण्यात आली आहे. राज्यपालांनी बहुमत चाचणी सिद्ध करायचं पत्र दिल्यानंतर असा धोरणात्मक आणि लोकप्रिय निर्णय घेता येत नसल्याचा आक्षेप घेत नामांतराला स्थगिती दिली आहे. याआधीही हाच मुद्दा पुढे करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आक्षेप घेतला होता.
यावरून संजय राऊत म्हणाले, नामकरण आणि इतर गोष्टीसाठी ही लोक आंदोलन करीत होते. हे सरकार बेकायदेशीर आहे. या सरकारबाबतचा निर्णय अद्याप कोर्टात आहे. लोकांची भावना आहे. लोकांचा आग्रह आहे. आरेचा विषय तुमचा जिव्हाळ्याचा होता. पवार साहेबांशी माझं बोलणं झालं आहे. आम्ही गद्दार नाही. त्यामुळे आम्ही प्रयत्न करीत आहोत. शिवसेना संपवणारे भाजपसोबत गेले आहेत, त्यांचं त्यांना लक लाभो असे देखील राऊत यावेळी म्हणाले.