राजकारण
मुख्यमंत्री शिंदेंच्या पत्रकार परिषदेचा संजय राऊतांना पास मिळाला पण राऊत म्हणाले...
छत्रपती संभाजीनगरमध्ये आजपासून कॅबिनेटची बैठक होत आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये आजपासून कॅबिनेटची बैठक होत आहे. 2 दिवस ही बैठक चालणार असून या बैठकीसाठी पूर्ण मंत्रिमंडळ छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झालं आहे. तब्बल 7 वर्षानंतर मराठवाड्यामध्ये मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात येत आहे.
याच पार्श्वभूमीवर या बैठकीनंतर होणाऱ्या पत्रकार परिषदेत संजय राऊत देखील पत्रकार म्हणून उपस्थित राहणार अशी चर्चा आहे. संजय राऊत यांना पोलिसांनी पत्रकार परिषदेत उपस्थित राहण्यासाठी पास दिला. अशी माहिती पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी दिली.
यावर प्रतिक्रिया देत संजय राऊत म्हणाले की, मी महाराष्ट्रातला ज्येष्ठ संपादक आहे. माझी इच्छा झाली तर मी जाईन. पण मी गेलो तर गोंधळ निर्माण होईल आणि मला तो नकोय. असे ते म्हणाले.