Sanjay Raut | Eknath Shinde
Sanjay Raut | Eknath ShindeTeam Lokshahi

'बंडखोरांनी बाळासाहेबांच्या नावाने भिक मागू नये'

तुर्तास एकनाथ शिंदेंवर कोणतीही कारवाई नाही, शिवसेनेचा निर्णय
Published by :
Shubham Tate
Published on

Sanjay Raut eknath shinde : शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आजच्या शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर सडकून टीका केली आहे. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे नाव बंडखोरांना वापरता येणार नाही. हिंमत असेल तर स्वताच्या बापाच्या नावाने मते मागा, असे आव्हान त्यांनी एकनाथ शिंदेंना केले आहे. तसेच शिवसैनिकांचे माझ्यावर थोडं जास्त प्रेम आहे, कारण मी बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा आहे. अस मत देखील यावेळी उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. (Sanjay Raut criticizes on eknath shinde)

Sanjay Raut | Eknath Shinde
श्रीकांत शिंदेच्या ऑफिसवर शिवसैनिकांची दगडफेक

यावेळी बोलताना नेते संजय राऊत म्हणाले की, तुर्तास एकनाथ शिंदेंवर किंवा त्यांच्या गटावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही, मात्र त्याचे संकेत सायंकाळी मिळतील असा माहिती वजा इशारा त्यांनी बंडखोरांना दिला आहे. तसेच बंडखोरांनी बाळासाहेबांच्या नावाने भिक मागू नये, अशी बोचरी टीका देखील यावेळी राऊतांनी केली आहे.

Sanjay Raut | Eknath Shinde
हंगामी अध्यक्ष नेमून झिरवळांवर अविश्वास प्रस्ताव पारित होणार?

त्याशिवाय, बंडखोरांवर कारवाई करण्याचे सर्व अधिकार उद्धव ठाकरे यांना दिले आहेत. या ठरावामुळे आता उद्धव ठाकरे यांच्याकडून आता बंडखोरांवर कारवाई करण्यात येणार आहे. शिवसेनेने आपल्या ठरावात पुन्हा एकदा मराठी अस्मिता आणि हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला आहे. मराठी अस्मिता आणि हिंदुत्वाशी प्रतारणा करणार नसल्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. अशीही माहिती त्यांनी यावेळी बोलताना दिली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com