Sanjay Raut | shivsena | eknath shinde
Sanjay Raut | shivsena | eknath shindeteam lokshahi

'दिल्लीतून कितीही औरंगजेब येऊ द्या, त्यांचं थडगं महाराष्ट्रात बांधलं जाईल'

तुमच्या ईडीला, सीबीआयला आम्ही घाबरत नाही; संजय राऊत
Published by :
Shubham Tate
Published on

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (eknath shinde) व त्यांच्यासोबतचे ४० बंडखोर आमदार तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असे शिवसेनेत उघड दोन गट पडले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यभरातील शिवसैनिक आक्रमक झाले असून बंडखोर आमदारांची कार्यालयेदेखील फोडण्यात येत आहेत. शिवसैनिकांची हीच आक्रमकता लक्षात घेऊन राज्यातील पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून ठिकठिकाणी सुरुक्षा वाढवण्यात आली आहे. (Sanjay Raut criticizes Eknath Shinde with BJP)

Sanjay Raut | shivsena | eknath shinde
इंदिराजींनी किशोर कुमारांच्या रेडिओवरील आवाजावर घातली होती बंदी

दरम्यान, शिवसेनेच्या मेळाव्यात बोलताना शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले की, मी देव वगैरे मानत नाही पण बाळासाहेब ठाकरेंना मानतो. तो एक दैवी पुरुष होता, आणि त्याचा धर्म पाळवतो.

जे अफझल खानानं केलं तेच तुम्ही करतायत. अशी टीका ही एकनाथ शिंदेंवर केली. काल बडोद्यात फडणवीस-शाह भेटले, त्यावरून असं दिसतय की भाजपनं शिवसेनेला संपवण्याचा विडा उचललाय. त्यांना बाळासाहेब ठाकरेंचं नाव संपवायचंय, त्यांच्या बापजन्मी ते शक्य होणार नाही. दिल्लीतून कितीही औरंगजेब येऊ द्या, त्यांचं थडगं ह्या महाराष्ट्रात बांधलं जाईल. अशी बोचरी टीका त्यांनी यावेळी भाजपवर केली आहे. तुमच्या ईडीला, सीबीआयला आम्ही घाबरत नाही.

Sanjay Raut | shivsena | eknath shinde
तिस्ता सेटलवाडला एटीएसने घेतले ताब्यात, एनजीओ प्रकरणी होणार चौकशी

दुसरीकडे एकनाथ शिंदे देखील माघार घेण्यास तयार नसून त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा समावेश असलेला शिवसेनेचा नवा गट स्थापन केल्याचे म्हटले जात आहे. याचदरम्यान विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी १६ बंडखोर आमदारांना नोटीस बजावली आहे. नोटिशीचे उत्तर न दिल्यास या आमदारांवर कारवाई केली जाऊ शकते. तर दुसरीकडे येत्या २४ तासांत बंडखोरांचे मंत्रीपद जाणार असल्याचा इशारा शिवसेनेचे संजय राऊत यांनी दिला आहे.

विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी १६ बंडखोर आमदारांना पुन्हा एकदा नोटीस बजावली आहे. या १६ आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेने केली होती. याच मागणीची दखल घेत झिरवळ यांनी ही नोटीस बजावली असून त्यांना ४८ तासांचे अल्टिमेटम दिले आहे. त्यामुळे आता शिंदे गटातील बंडखोर आमदार काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या नोटिशीनंतर शिंदे गटातील आमदार न्यायालयात जाण्याची शक्यता असून झिरवळ ते यांच्या नोटिशीला आव्हान देण्याची शक्यता आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com