पालघर, खारघर सदोष मनुष्यवधच! मग वेगवेगळा न्याय का? राऊतांचा सवाल

पालघर, खारघर सदोष मनुष्यवधच! मग वेगवेगळा न्याय का? राऊतांचा सवाल

खारघर घटनेवरुन ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सामना रोखठोकमधून शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र डागले आहे.
Published on

मुंबई : खारघर येथे 14 श्रीसदस्यांचा उष्माघाताने मृत्यू झाला असून अनेक जण उपचाराधीन आहेत. यावरुन ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सामना रोखठोकमधून शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र डागले आहे. नवी मुंबईतील खारघर येथील बळी सरकारने उकळत्या उन्हात घेतलेले हे बळी आहेत. हेसुद्धा सदोष मनुष्यवध आणि पालघरच्या तीन साधूंची हत्या म्हणजेही सदोष मनुष्यवधच! मग वेगवेगळा न्याय का, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.

 पालघर, खारघर सदोष मनुष्यवधच! मग वेगवेगळा न्याय का? राऊतांचा सवाल
अमृतपाल सिंगला अखेर अटक; पोलिसांसमोर केलं आत्मसमर्पण

माणसांच्या जिवाची सध्या कोणालाही किंमत नाही व पातळी घसरलेल्या राजकारणाने तर सध्या मरण सगळय़ात स्वस्त केले. ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार सोहळा भरदुपारी रणरणत्या उन्हात पार पडला. राजकारणी, श्रीमंतांच्या खाशा स्वाऱ्यांसाठी थंड मंडप आणि सावलीतले व्यासपीठ उभे केले व लाखोंचा जनसागर उन्हात. त्यात 14 जीवांचे बळी गेले. हा आकडा खरा नाही. सरकारी बेफिकिरीचे हे बळी, पण सरकारला आता देवाचे स्थान. कारण गरीबांना सरकार देते. त्यामुळे मृत्यूही सरकारने दिला. मग 14 निरपराध्यांच्या मृत्यूबद्दल सदोष मनुष्यवधाचा गुन्हा सरकारवर का दाखल होऊ नये? हा सरळ प्रश्न आहे, असे राऊतांनी म्हंटले आहे.

खारघर येथे ‘महाराष्ट्रभूषण’ सोहळय़ाच्या निमित्ताने लाखोंची गर्दी जमवून गृहमंत्री अमित शहांकडून पाठ थोपटून घ्यायची हा मुख्यमंत्री शिंदे यांचा राजकीय स्वार्थ होता. पुलवामा आणि खारघर या दोन्ही दुर्घटनांत निरपराध मारले गेले. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दोन्ही बाबतीत सरकारकडून घडला.

आता भारतीय जनता पक्षाचा दुटप्पीपणा कसा तो पहा. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना पालघरला जमावाकडून तीन साधूंचे हत्याकांड झाले. त्यामुळे ठाकरेंच्या राज्यात हिंदुत्वाची हत्या झाली अशी बोंब देशभरात मारून एक वातावरण निर्माण केले गेले. पण आता 14 जण हिंदुत्वाच्या कार्यासाठीच खारघरला आले होते व सरकारी बेफिकिरीचे बळी ठरले. मात्र या हत्याकांडावर फडणवीस आणि त्यांच्या भाजपची संपूर्ण ‘तीर्थयात्रा’ गप्प आहे. 14 हिंदू धार्मिक कार्पामात मारले गेले. हे सर्व प्रकरण पैसे वाटून मिटवण्यासाठी इस्पितळात व मृतांच्या घरी कोणाचे लोक पोहोचले? गृहमंत्री फडणवीस, कृपया चौकशी करा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

पालघरचे साधू हत्याकांड व खारघरचे श्री सेवकांचे हत्याकांड यात फरक करता येणार नाही. पालघरच्या तीन साधू हत्याकांडावर जो ‘भाजप’ व त्यांचे मंत्री उसळून उठले ते खारघरच्या ‘साधक’ बळांवर गप्प आहेत, अशी टीका संजय राऊतांनी शिंदे-फडणवीसांवर केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com