Sanjay Raut : फुटीर गट एवढा मोठा पक्ष की चंद्रावरसुध्दा कार्यालय स्थापन करेल
मुंबई : आमदारांनंतर आता शिवसेनेच्या 12 खासदारही शिंदे गटात सामील झाले आहेत. या खासदारांकडून संसदेतील शिवसेना कार्यालय ताब्यात घेण्याचा हालचाली सुरु केल्या आहेत. यावर शिवसेना खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) टीकास्त्र सोडले आहे. फुटीर गट चंद्रावरसुध्दा कार्यालय स्थापन करेल, असा टोला त्यांनी लगवला आहे.
संसदेच्या शिवसेना कार्यालयावर फुटीर खासदरांकडून ताबा मिळवण्यात येतोय, यावर राऊत म्हणाले, फुटीर गट चंद्रावरसुध्दा कार्यालय स्थापन करेल, एवढे हवेत आहे. त्यांना शिवसेना भवन, मातोश्री, सामनाचा ताबा हवा आहे. एक दिवस जो बायडेनचे घरही ताब्यात घेतील एवढा मोठा पक्ष आहे त्यांचा. एवढेच नव्हे तर बाळासाहेब ठाकरे यांचा मुळ पक्ष आमचाच आहे अथवा बाळासाहेब ठाकरेंना आम्हीच पक्षात आणले आहे, असे सांगायलाही ते कमी करणार नाही. उध्दव ठाकरेंना आम्हीच प्रमुख केले. ज्या पध्दतीने राज्यात चित्र दिसतय ते काही विचार करु शकत नाही, अशी टीका संजय राऊत यांनी बंडखोरांवर केली आहे.
12 खासदारांचा फुटीर गट भाजपच्या प्रेरणेने आम्हाला सोडून गेला. ते कालपर्यंत आमचे सहकारी होते. आणि आजही मी त्यांना सहकारी मानतो. कोणत्या मजबूरीतून आम्हाला सोडले हे त्यांना माहित आहे. हिंदुत्व व युती ही फक्त तोंडी लावयला, असेही राऊतांनी म्हंटले आहे.
बंडखोरांकडून संजय राऊतांमुळे युती तुटली. संजय राऊतांमुळे बाहेर पडतोय असे वारंवार आरोप केले जात आहे. या आरोपांना प्रत्तित्युर देताना संजय राऊथ म्हणाले, 2014 साली भाजपाने युती तोडली तेव्हा संजय राऊत कुठे होते. भाजपाने 2019 साली शब्द मोडला तेव्हा कुठे होते. 2014 ते 2019 या काळात घडलेल्या घटनांना जबाबदार कोण आहे. उध्दव ठाकरेंच्या कुटुंबावर ज्याप्रकारे शिवराळ, चिखलफेक भाजपाकडून झाली त्याला संजय राऊत जबाबदार आहेत का, असे सवाल त्यांनी उपस्थित केले आहेत.
संजय राऊत म्हणाले की, माझ्यावर चुकीची केस बनवली आहे. तरीपण मी ईडीसमोर जातो. या प्रकारच्या राजकीय वातारणात मला ईडीचे समन्स येण्याची अपेक्षा होती. आणि ते आले. आता संसद सुरु असल्याने मी वेळ वाढवून मागितली आहे. खासदार म्हणून त्या एजन्सीचा आदर करणे कर्तव्य आहे. जरी मला, लोकांना चुकीचे वाटत असले तरीही मी माहिती देण्यासाठी जबाबदार आहे.
आजच्या सुनावणीवर आमचेही लक्ष आहे. पण, आज निर्णय होईल, असे वाटत नाही. सर्वोच्च न्यायालयातून आम्हाला न्याय मिळेल. लोकशाही जिवंत आहे. आणि लोकशाहीची एवढी उघडपणे हत्या कोणीही करु शकत नाही. याबाबत न्यायलय, मुख्य न्यायाधीशांकडून आम्हाला न्याय मिळेल याची आम्हाला खात्री आहे. ज्या पध्तीने घटनेची पायमल्ली करुन फुटीर गटाला मान्याता देण्याचे काम होत आहे. पक्षांतर बंदीचा कायद्याचे नियमांचे उल्लंघन केले जात. आहे. अशात लोकशाहीला एकमेव किरण सर्वोच्च न्यायलयाचा आहे.