गुलाबरावचे जुलाबराव होईल, ते 50 खोके त्यांना पचणार नाहीत; राऊतांचा शाप

गुलाबरावचे जुलाबराव होईल, ते 50 खोके त्यांना पचणार नाहीत; राऊतांचा शाप

Sanjay Raut यांचे बंडखोर आमदारांवर टीकास्त्र
Published on

नाशिक : बंडखोर आमदारांना पन्नास खोके त्यांना पचणार नाही. गुलाबरावचे (Gulabrao Patil) जुलाबराव होईल. पण, पचणार नाही. सर्वांना जुलाब सुरु होतील, असा शापच शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिला आहे. संजय राऊत सध्या नाशिक दौऱ्यांवर असून त्यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

ते आमदारांना घेऊन जाऊ शकतात. पण, शिवसैनिकाला पळवून नेऊ शकत नाही. 40 आमदार म्हणजे शिवसेना नाही, असे संजय राऊत यांनी म्हंटले आहे. हे 50 खोके त्यांना पचणार नाही. गुलाबरावचे जुलाबराव होईल. पण, पचणार नाही. सर्वांना जुलाब सुरु होतील, अशी टीकाच त्यांना बंडखोरांवर केली आहे.

बंडखोर आमदारांमध्ये चिमणराव आबा पाटील हेही आहेत. ते साधे माणूस आहेत. गुलाबरावाने जळगावात शिवसेना वाढू दिली नाही. शिवसैनिकांना त्रास दिला. गुलाबारांवाना कंटाळून शिवसेना सोडून शिंदे गटात गेलो, असे कारण चिमणराव आबा पाटील यांनी दिले. आणि तिथे गेले तर गुलाबराव पदरात पडले, असे राऊतांनी म्हणताच शिवसैनिकांमध्ये हशा पिकला.

संजय राऊत पुढे म्हणाले, ही सर्व कारणे बकवास आहेत. खरी कारणे आता समोर येतील. मुख्य कारण खोकेबाजी. त्या खोकेबाजीला ठोकेबाजीने उत्तर द्यायला पाहिजे. आमची शिवसेना खरी आहे. धनुष्यवाण आमचा पंचप्राण आहे. हा पंचप्राण 2-5 खोक्यांनी विकला जाणार नाही. धनुष्याबाण शिवसेनेचाच राहील, असा विश्वास राऊतांनी व्यक्त केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com