भाजपाच्या आराध्य दैवतांकडून शिवरायांचा अपमान, किती वेळ हात चोळत बसणार : संजय राऊत

भाजपाच्या आराध्य दैवतांकडून शिवरायांचा अपमान, किती वेळ हात चोळत बसणार : संजय राऊत

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. यावरुन संजय राऊतांनी पुन्हा एकदा शिंदे-फडणवीसवर निशाणा साधला आहे.
Published on

मुंबई : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. यावरुन राजकीय वातावरण चांगलेत तापले असून आंदोलनाचा इशारा शिंदे-फडणवीस सरकारला दिला आहे. अशातच संजय राऊतांनी पुन्हा एकदा शिंदे-फडणवीसवर निशाणा साधला आहे.

भाजपाच्या आराध्य दैवतांकडून शिवरायांचा अपमान, किती वेळ हात चोळत बसणार : संजय राऊत
राजकारण म्हणजे मिमिक्री नाही, आता आपण मॅच्युअरड; राऊतांचा राज ठाकरेंना टोला

संजय राऊत म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज आमचे आराध्य दैवत आहेत. आणि ज्या पध्दतीने त्यांचा सातत्याने अपमान भाजपच्या आराध्य दैवतांकडून होत आहे. त्यांना वाटत असेल जसे राजकारण चालू आहे. त्या पध्दतीने आम्ही हाही विषय बाजूला करु. महाराष्ट्रवर जो अन्याय होत आहे. त्याविषयी विरोधी पक्ष एकत्र आलेला आहे. अ‍ॅ क्शन प्लॅन तयार आहे. त्यासंदर्भात व्यवस्थित हालचालीही सुरु आहेत. आम्ही वाट बघतोय छत्रपती शिवाजी महाराजांचा इतका घणघोर अपमान होऊनही सरकार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ व आमदार हे हात चोळत कसे बसलेत. स्वाभिमानाचे कारण देत पक्ष सोडून गेलेले आता तोंड शिवून हे आम्ही राज्याला दाखवतोय.

छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाल्यानंतर हे सरकार मुठी आवळून उभे राहत नाहीयेत. याच लोकांनी शिवसेना फोडली कारण शिवसेनेला महाराष्ट्राचा अभिमान आहे. याविरोधात उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जी पावले उचलायची आहेत ते उचलत आहोत. तसेच, रविवारी छत्रपती संभाजीराजे व उदयनराजे यांनी जी भावना घेतली. ती लोकभावना आहे. भाजपचे हे ठगे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करुन पुन्हा महाराष्ट्राला शहाणपण शिकवत आहेत. हे महाराष्ट्र पाहतोय. याचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा राऊतांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिला आहे.

भाजपाच्या आराध्य दैवतांकडून शिवरायांचा अपमान, किती वेळ हात चोळत बसणार : संजय राऊत
महिलांबाबत केलेल्या 'त्या' वक्तव्यावर रामदेव बाबांचा अखेर माफीनामा

पंडित नेहरुंवरीलही चिखलफेक थांबवा. पंडित नेहरु होतो म्हणून हा देश पुढे गेला आहे. ज्यांनी स्वातंत्र्यलढ्यात योगदान दिलेले आहे. देशाच्या विकासात योगदान दिलेले आहे. अशा देशातल्या कोणत्याही महान नेत्याचा अपमान होऊ नये, असे त्यांनी म्हंटले आहे. एवढचे प्रेम आहे तर वीर सावरकारांना भारतरत्न द्या. इंडिया गेटजवळ नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा पुतळा उभारलेला आहे. त्यांच्या बाजूला वीर सावरकरांचा पुतळा का उभारला नाही. सावरकारांचा पुतळा उभारा आम्ही स्वागताला येतो. पण, त्यांना केवळ वीर सावरकरांच्या नावाने राजकारण करायचे आहे, अशी टीका संजय राऊतांनी भाजपवर केली आहे.

भाजपाच्या आराध्य दैवतांकडून शिवरायांचा अपमान, किती वेळ हात चोळत बसणार : संजय राऊत
खडसेंचे षडयंत्र घड्याळात कैद, लवकरच समजेल; गिरीश महाजनांचा इशारा
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com