ग्रामपंचायत निवडणुकीनंतर घटनाबाह्य सरकार फुसके फटाके वाजवतेयं; राऊतांचा घणाघात

ग्रामपंचायत निवडणुकीनंतर घटनाबाह्य सरकार फुसके फटाके वाजवतेयं; राऊतांचा घणाघात

राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीत महायुती एक नंबर ठरल्याचा दावा शिंदे गट आणि भाजपकडून करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी शिंदे गट-भाजपवर घणाघात केला आहे.
Published on

मुंबई : राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहिर झाले आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत महायुती एक नंबर ठरल्याचा दावा शिंदे गट आणि भाजपकडून करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गट-भाजपवर घणाघात केला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीनंतर फटाके घटनाबाह्य सरकार वाजवते ते फुसके असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीनंतर घटनाबाह्य सरकार फुसके फटाके वाजवतेयं; राऊतांचा घणाघात
पुणे इसिस मॉड्युल प्रकरणात खळबळजनक माहिती; सिरीयातून भारतात इसिसची मोर्चेबांधणी

मुख्यमंत्री काय बोलतात याकडे महाराष्ट्र गांभीर्याने पाहत नाही. ग्रामपंचायत निवडणुकीनंतर फटाके घटनाबाह्य सरकार वाजवते ते फुसके आहेत. निकालाचे आकडे प्रत्येक जण आपापल्या बाजूने दाखवत आहे. आम्ही कसे जिंकलो आणि विरोधक कसे हरले हे दाखवत आहेत हा एक मूर्खपणा आहे. या निवडणुका पक्ष आणि चिन्हावर लढवल्या जात नाही हे जर घटनाबाह्य सरकारला माहित नसेल तर हे अनाड्यांचं सरकार आहे असं म्हणावं लागेल. हे अनाडी घोडे उधळलेले आहेत, अशी टीका संजय राऊतांनी केली आहे.

जे राजकीय पक्ष विद्यापीठाच्या सिनेट निवडणुका घ्यायला घाबरतात, त्यांची हातभर फाटते. त्यांनी ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालावर दावा सांगावा हे हास्यास्पद आहे. जे 14 महापालिकांच्या निवडणुका घेत नाहीत ते सांगतात आम्ही ग्रामपंचायत निवडणुका जिंकलो. तुम्ही सिनेट आणि मुंबई महापालिकेसह इतर 14 महापालिकांच्या निवडणुका घ्या आणि मग सांगा कोण जिंकलं कोण हरलं, असं आव्हानच त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिले आहे.

ते काही आकडे सांगू दे त्यांना आकडा लावायची सवय आहे. त्यांचे आता फक्त आकड्यांचेच खेळ चालू आहेत 50 खोके 40 खोके. निवडणुका जाहीर झालेले असताना तुम्ही रडीचा डाव खेळत आहात. त्यांचा एक पक्ष आणि एक निवडणूक अस ठरतंय, असेही राऊतांनी म्हंटले आहे.

छगन भुजबळांनी सरसकट आरक्षणाला विरोध केला आहे. याबाबत राऊत म्हणाले की, हा सगळा विषय अत्यंत नाजूक आणि गंभीर आहे. जातीपातीच्या नावावर हे राज्य फोडण्याचं एक षडयंत्र सुरू आहे. या राज्यात राजकीय अस्थिरता राहावी यासाठी प्रयत्न केला जातोय आणि यामुळे या ठिकाणचा रोजगार उद्योग हे बाजूच्या राज्यामध्ये जावे यासाठी टाकलेले डाव आहेत. आपल्या राज्यकर्त्यांनी या डावांमध्ये फसू नये आणि या राज्यामध्ये सामाजिक एकता राहावी यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करावे अशी शिवसेनेची भूमिका आहे, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, लालूप्रसाद यादव म्हटले आहेत की जर मी भाजपमध्ये गेलो तर मी हरिश्चंद्र झालो असतो. महादेव ॲपमध्ये भूपेश बघेल अडकले आणि जर ते आता भाजपमध्ये गेले तर त्यांचा हर हर महादेव होईल. हसन मुश्रीफ, अजित पवार, छगन भुजबळ हे सुद्धा महादेव ॲपचे मेंबर आहेत. त्यांना जेलमध्ये पाठवायचं होतं मात्र, आता त्यांची आता पूजा केली जाते. देवेंद्र फडणवीस अमित शहा यांच्यावर फुल टाकतात. गोंदियामध्ये तुम्ही बघितला असेल प्रफुल्ल पटेल यांनी मोदींचे स्वागत केलं. इकबाल मिरचीसोबत संबंध असल्याचा आरोप प्रफुल पटेलांवर यांनीच केला होता. आता तेच हातात हात घालून चालत होते हे सगळे महादेव ॲप कमाल आहे, असा निशाणा राऊतांनी साधला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com